मॉक्सो: साप हा एक असा प्राणी आहे की त्याचे नाव ऐकताच अनेकांची भंबेरी उडते. जर कधी साप तुमच्या समोर आला असेल तर नक्कीच तुम्ही घाबरले असाल. साप एक असा प्राणी आहे जो कधीही आणि कुठेही घुसू शकतो, कुठेही लपू शकतो. अनेकदा साप घरात, पलंगावर, कपड्यांमध्ये, बुटांमध्ये, कपाटांमध्ये, घराच्या कोपऱ्यात लपला असल्याचे फोटो व्हिडिओ आपण पाहिले असतील. मात्र, यावेळी एक साप थेट एका महिलेच्या तोंडातून तिच्या पोटात शिरला. ही धक्कादायक घटना जेव्हा डॉक्टरांना माहिती झाली तेव्हा ते देखील हादरले होते.

ट्विटरच्या @FascinateFlix अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर महिलेच्या पोटातून चार फुटांचा साप बाहेर काढत असल्याचे तुम्ही पाहू शकता. हे नेमकं झालं कसं, हा चार फुटांचा साप त्या महिलेच्या पोटापर्यंत पोहोचला कसा. तर ही महिला गाढ झोपेत असताना तिच्या तोंडात एक साप घुसला आणि तो थेट तिच्या पोटात गेल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या सापाला बाहेर काढले. चार फुटांचा साप पाहून डॉक्टरांच्या टीमलाही धक्का बसला.

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ –

कारचा अपघात, पण चालकाची बॉडी चार किलोमीटरवर, अंगावर कपडेही नाही; नाशकात विचित्र घटना
हा व्हायरल व्हिडिओ खरंच धडकी भरवणारा आहे. हे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडिओमध्ये एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध दिसत आहे, तिच्या तोंडातून डॉक्टर काहीतरी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यानंतरच काहीच क्षणात डॉक्टरांनी तिच्या तोंडातून तब्बल ४ फूट लांब साप बाहेर काढला. हे पाहून डॉक्टरही घाबरुन दोन पावले मागे झाले. या व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित करुन सोडलं आहे. एखादी व्यक्ती इतकी गाढ कशी झोपू शकते की त्याच्या तोंडात साप जातो, तिथून तो तिच्या पोटात जातो आणि त्याला ते कळतही नाही.

प्रेमाला नकार, त्याची सटकली; तरुणीच्या बॉयफ्रेंडला गिफ्टमध्ये बॉम्ब पाठवला अन् मग…
रशियातील दागेस्तान भागातील एका छोट्या गावात ही महिला इतकी गाढ झोपली होती की तिच्या तोंडावाटे एक साप तिच्या पोटात शिरला. तिला याबाबत काहीही कळलं नाही. जेव्हा तिला थोडं अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा ती डॉक्टरकडे गेली. जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा तिच्या पोटात ४ फुटाचा साप असल्याचं त्यांना कळालं. डॉक्टरांनी तिच्यावर उपटार करत तिच्या पोटातून ४ फूट लांब साप बाहेर काढला. मात्र, अहवालानुसार हा साप जिवंत होता की मेलेला याबाबत काहीही माहिती नाही. मात्र, हा व्हिडिओ धडकी भरवणारा आहे.

क्षणात संसाराची माती, पत्नीने विष घेतलं अन् पतीनेही आयुष्य संपवलं…. कारण हादरवणारं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here