सातारा : सातारा भेटीवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर निशाणा साधला. ‘खोकेवाले भोसले’ म्हणून डी. पी. भोसले हे कोरेगावमध्ये परिचित होते. आत्ताचे खोकेवाले नाही, तेव्हाचे खोकेवाले वेगळे होते. तेव्हाचे भोसले तुम्हाला हवं ते घ्या, असं म्हणायचे. मात्र, आजच्या खोक्यांवर मी आता जास्त काही बोलत नाही’, असं म्हणत शरद पवार यां‌नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारमधील मंत्री आणि आमदारांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

पवारांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला

भाजपमध्ये आल्यानंतर चौकशी थांबली असं एखादं नाव सांगावं? असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केला होता. त्यावर कराडमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी जे बसतात, ते शेजारी घ्या. त्यांच्या आजूबाजूला शेजारीच ठाण्याचे जे बसतात, त्यांचे मी आता नावे काय घेत बसत नाही. असे अनेक लोकांबाबत सांगता येईल, असं म्हणत शरद पवार यांनी प्रताप सरनाईक यांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांना टोला लगावला.

मनिष सिसोदिया यांच योगदान मोठं आहे. त्यांनी दिल्लीत बाहेरील राज्यातील चोरटी दारू येत आहे, म्हणून दारूवरचा टॅक्स कमी केला. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. अशाप्रकारे आठ राज्यातील नेत्यांना अटक करण्यात आली. अशा नेत्यांचा उल्लेख करून पत्र लिहिण्यात आलं आहे. अशा प्रकारे गुन्हे दाखल करून अटक केली आणि ते भाजपामध्ये गेले. त्यानंतर या केसेस काढण्यात आल्या, अशी सगळी एकत्रित माहिती त्या त्या पत्रात लिहिली आहे, असं शरद पवार म्हणाले. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, राज्यपालांचा वाढता हस्तक्षेप, विरोधी पक्षांमधील नेत्यांवरील कारवाई तेच नेते भाजपमध्ये आले की तपास यंत्रणांच्या कारवाईचा मंदावणारा वेग या मुद्यांवरुन देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. विरोधी पक्षांच्या ९ नेत्यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आम्हाला वंशज असल्याचे पुरावा मागता आणि आता भाजपत आम्हाला मान नाही म्हणता.. लाज वाटू द्या जरा, उदयनराजे खवळले
कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे. मी राज्यभर फिरतो, पण एवढे जास्त प्रमाण मी कोठे पाहिलं नाही. मुली आज कोणत्याही गोष्टींमध्ये मागे नाहीत. जगाच्या कानाकोपऱ्यात या मुलींनी नावलौकिक मिळवला आहे. भविष्यात या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी कोरेगावसह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवतील, असं शरद पवार म्हणाले.

निर्लज्जपणाची हद्द, विकृत स्वभावामुळे संजय राऊतांकडून राजघराण्यावर टीका; उदयनराजे संतापले

देशातील तिन्ही सैन्य दलामध्ये मुलींना संधी दिली पाहिजे. देशातील सैन्य दलामध्ये १८ टक्के मुली या घेतल्या पाहिजेत, असा निर्णय देशाचा संरक्षणमंत्री असताना घेतला होता. आज सर्व ठिकाणी मोठ्या पदांवर मुली नेतृत्व करत आहेत, त्या कर्तुत्व दाखवत आहेत. मुलींवर काम सोपवल्यास अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा हा तिचा स्थायीभाव आहे. त्यामुळे घडामोडींवर तिचे लक्ष हे बारीक असते. त्यामुळे हा निर्णय घेणं मला सहज सोपं झाले, असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here