भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अजूनही प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत, याची उदाहरणंच वरील तीन घटनांमधून प्रकर्षाने समोर आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने रुपाली चाकणकर यांनी वरील घटनांची गंभीरपणे नोंद घेत कडक पावलेही उचलली आहेत.
रुपाली चाकणकरांकडून थेट निलंबनाचे आदेश
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे. आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने आशा वर्कर आणि आईलाच मुलीची डिलिव्हरी करावी लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्याचप्रमाणे नागपूर अंबाझरी तालुक्या मध्ये एका अल्पवयीन गर्भवतीने युटुबवर बघून स्वतःची डिलिवरी केली आहे त्यात तिच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे.
ह्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना राज्यातील बिघडलेली कायदा आणि आरोग्य व्यवस्था अधोरेखित करत आहेत. ह्या संपूर्ण बाबी गंभीर असून राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. ह्या प्रकरणांमध्ये तात्काळ चौकशीचे करावी आणि चौकशी पूर्ण होवून दोषींना शिक्षा होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आयोगाने आरोग्य संचालकांना दिले आहेत, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन दिली आहे.