सोलापूर: मालगाडीचा डबा घसरल्याने सोलापूरकडे येणाऱ्या रेल्वे प्रवासी वाहतूकीवर थेट परिणाम झाला आहे. वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस, काकीनाडा एक्सप्रेस या गाड्या तीन तास उशिराने धावत असल्याने सोलापूर स्थानकात उशिरा पोहोचणार असल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. चिंचवड ते वाडीदरम्यान जाणाऱ्या सामग्री एक्सप्रेसचा डबा दौंडजवळ घसरला. त्यामुळे सोलापूरकडे किंवा दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासी वाहतूक करणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर थेट परिणाम झाला आहे. रेल्वे मेकॅनिक विभागाने शर्थीचे प्रयत्न करून सामग्री एक्सप्रेसचा डबा रुळावर आणला असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दौंडजवळ सामग्री मालगाडीची एक ट्राली रुळावरून घसरली

चिंचवड येथून निघालेल्या सामग्री मालगाडीची एक ट्राली रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दौंड जवळ घसरली. यामुळे सोलापूरकडे येणाऱ्या प्रवासी एक्सप्रेस मेल वाहतूकीवर थेट परिणाम झाला आहे. जवळपास दोन तास मालगाडीचा डबा रेल्वे रुळावर आणण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सामग्री मालगाडीचा डबा रुळावर आणून दौंड स्थानकाकडे मालगाडी रवाना करण्यात आली.

घराला आग लागली तरी नवऱ्याची इच्छा असेल तर बायकोने सेक्स करावा; मौलानाचं लाजिरवाणं वक्तव्य
वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस व काकीनाडा एक्सप्रेसला उशीर

मालगाडीचा डबा घसरल्याने सायंकाळच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकांवरून निघालेल्या प्रवासी वाहतुकीच्या मेल एक्सप्रेसवर थेट परिणाम झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून हुतात्मा एक्सप्रेस सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास निघते. तर वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरून सोलापूरकडे निघते. याच दरम्यान काकीनाडा एक्सप्रेस देखील पुण्याहून सोलापूरकडे प्रस्थान करते.

मरीन ड्राइव्हवर बसला म्हणून पोलिसाने घेतली २५०० रुपयांची लाच, स्क्रिनशॉट ट्विट करत केला दावा
दौंड जवळ डबा रुळावर आणण्याचे काम सुरू असल्याने हुतात्मा एक्सप्रेस, काकीनाडा एक्सप्रेसला लोणीजवळ थांबा देण्यात आला होता. तर वंदे भारत एक्सप्रेसला पुणे स्थानकावर जागा नसल्याने खडकी रेल्वे स्थनाकावर यायला रात्री ९ वाजले. यामुळे वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस जवळपास तीन तास उशिरा सोलापूर स्थनाकावर पोहोचतील. रात्री १० वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकात दाखल होणाऱ्या या महत्वाच्या मेल एक्सप्रेस रात्री १ वाजण्याच्या सुमारास दाखल होतील असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Sleep Tourism : फक्त चांगली झोप मिळावी म्हणून लोक करतात पर्यटन, कारण वाचून व्हाल हैराण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here