जयपूर: राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलाने आपल्याच वडिलांवर पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदार मुलाच्या तक्रारीनुसार, वडील (६० वर्षे) पत्नीसह (२१ वर्षे) पळून गेले आहेत. तिच्यासोबत एक लहान मुलगीही आहे, यामुळे तो खूप अस्वस्थ आहे. याप्रकरणी त्याने सदर पोलीस ठाण्यात वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील असल्याची माहिती आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या वडिलांवर पत्नीला पळवून नेल्याचा आरोप केला आहे. त्याच्या तक्रारीनुसार, १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला त्याचे वडील रमेश आपल्या पत्नीला घेऊन गेले.

VIDEO: अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांकडे गेली, तपासताच पोटात असं काही दिसलं की डॉक्टरही घाबरले…
पीडित पतीने सांगितले, त्याने पत्नीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही. तिला नेहमी सर्व सुख सोयी दिल्या. तिला आनंदी ठेवण्यासाठी तो मजुरी करायचा. पण माझे वडील तिला धमकावत असत. मी पत्नीला समजावून सांगायचे की, माझ्या वडिलांच्या सवयी चांगल्या नाहीत, त्यांच्या कमी संपर्कात राहा.

काही दिवसांपासून पत्नी बदलल्यासारखी वाटत होती. मला हे अनेकवेळा जाणवले होते, पण असे होईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पत्नीने माझ्या वडिलांबद्दल मला कधीच काही सांगितले नाही. माझी आई मनोरुग्ण आहे. मी अत्यंत त्रासात आहे. जेव्हा मला माझी पत्नी सापडेल तेव्हाच मी सुटकेचा नि:श्वास सोडेन, असं या दुर्दैवी पतीने सांगितलं.

कारचा अपघात, पण चालकाची बॉडी चार किलोमीटरवर, अंगावर कपडेही नाही; नाशकात विचित्र घटना
या प्रकरणी पीडित मुलाने वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या दोघांचाही शोध घेत आहेत. पण, त्यांच्या या कृत्याची चर्चा संपूर्ण गावात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here