सुरेश कुळकर्णी । जालनादूध खरेदी दराच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं आज केलेल्या आंदोलनाची माजी मंत्री यांनी खिल्ली उडवली आहे. ‘भाजपचे हे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांचं आंदोलन भरकटलेलं आहे,’ असं खोतकर यांनी म्हटलं आहे. (Shivsena Leader over milk rate protest)

दूध दराच्या मुद्द्यावरून भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे भाजपचे मित्रपक्षही आंदोलनात उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी निषेध प्रदर्शन करून नेत्यांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक केला जात आहे. रास्ता रोको केला जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खोतकर यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली.

‘भारतीय जनता पक्षाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजपच्या केंद्रातील सरकारनं आधी परदेशातून दूध भुकटी आयात करणं थांबवावं. तसं केलं तर त्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार राहील, असं खोतकर म्हणाले.

‘मी दुग्धविकास खात्याचा मंत्री असताना दुधाचे भाव वाढविण्यासाठी प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही हा प्रश्न व त्यातील समस्यांची पूर्ण माहिती आहे. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही त्यांची सुरुवातीपासूनच भूमिका आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते १०० टक्के प्रयत्न करत आहेत,’ असं ते म्हणाले. ‘एकीकडं आंदोलनं करायची आणि दुसरीकडं दूध भुकटी आयात करायची, हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळं भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आधी केंद्र सरकारला दूध भुकटीची आयात थांबवण्याची विनंती करावी. गरज पडल्यास त्यासाठी आंदोलन करावे, असा सल्लाही खोतकर यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here