अविनाश महाजन

नागपूर : उपराजधानीत ‘स्पेशल २६ पटर्न’ पोलिसांच्या सतर्कतेने फसला. पोलिसांनी ठकबाज तरुणाला बेड्या ठोकल्या. विजय रणसिंग (वय ३३, रा. माहूर, यवतमाळ), असे अटकेतील युवकाचे नाव आहे. त्याने आतापर्यंत २०पेक्षा अधिक युवकांची सुमारे २५ लाखांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

विजयचे बी.फार्म.पर्यंत शिक्षण झाले आहे. तो मूळ उस्मानाबाद येथील रहिवासी असून, तो स्वत:ला सर्वोच्च न्यायालयाचा ‘डेस्क ऑफिसर’ असल्याचे सांगतो. त्याच्याकडे बनावट ओळखपत्रही आहे. शनिवारी दुपारी तो महालमधील एका महाविद्यालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या डेस्क लिपिकासाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा आपल्या महाविद्यालयात घ्यायची असल्याचे त्याने सांगितले. व्यवस्थापनाने त्याला परवानगी दिली. नंतर तो कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गेला. मी सर्वोच्च न्यायालयात डेस्क ऑफिसर असल्याचे सांगून पोलिसांवर रुबाब टाकला. लिपिक पदाची लेखी परीक्षा घ्यायची आहे. त्यासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र हवे आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने पोलिसांना डेस्क ऑफिसर असल्याचे ओळखपत्रही दाखविले.

कोणी फोडला १२ वीच्या गणिताचा पेपर, आरोपीला शोधण्यात पोलिसांना मोठं यश; नाव वाचून हादराल…

पोलिसांचा संशय खरा ठरला…

ओळखपत्र बघताच कोतवाली पोलिसांना संशय आला. त्यांनी पोलिस उपायुक्त गोरख भामरे यांना माहिती दिली. भामरे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना कळविले. आयुक्तांनी व्हॉट्सअॅपवर त्याचे ओळखपत्र मागविले. उच्च न्यायालयात चौकशी केली असता सर्वोच्च न्यायालयात असे कोणतेही पद नसल्याचे आयुक्तांना कळाले. पोलिस आयुक्तांनी त्याची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले. झाडाझडती घेतली असता तो पोपटासारखा बोलला. बेरोजगारांना फसविल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

प्रेमी युगुलाचे मंदिरातच अश्लील चाळे, भक्ताने जाऊन रोखलं; तरुणाने क्षणात केल्याचं होत्याचं नव्हतं…

यवतमाळात अधिकाऱ्यांची केली दिशाभूल

विजय याचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे. तो यवतमाळ अधिकाऱ्यांवर रूबाब गाजवतो. त्याने अनेक अधिकाऱ्यांनाही फसविल्याची माहिती आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे अनेकदा शासकीय विश्रामगृहाचा त्याने मोफत वापर केल्याचेही कळते.

कांद्याच्या घसरणीवरून नाफेडकडे छगन भुजबळांची मोठी मागणी, असं झालं तर शेतकऱ्यांची चांदीच….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here