dombivli building crack, डोंबिवलीत ‘जोशीमठ’; होळीचा सण असतानाच ‘त्या’ इमारतीतील २५० कुटुंबे रस्त्यावर – 250 families left homeless after 22-year-old dombivli building gets crack
डोंबिवलीः होळी-रंगपंचमी सण आणि मुलांच्या परीक्षा चालू असताना डोंबिवलीतील २५० कुटुंबावर संकट कोसळलं आहे. इमारतीमधील कुटूंबाना आणि कुटूंबातील मुलांना रस्त्यावर यावे लागले आहे. शनिवारी रात्री इमारतीला तडा गेला, रविवारी सुट्टीचा दिवस. मात्र सोमवारी मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुलांना शाळेत पाठवायचं कसं? असे अनेक प्रश्न आता त्या कुटूंबातील लोकांसमोर उभे ठाकले आहेत.
दरम्यान कल्याण शीळ रोडवर काल रात्रीच्या वेळी अचानक २०० ते २५० नागरिकांनी थेट रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. पोलिसांनी सदर आंदोलकांना रोखून धरले. डोंबिवलीजवळील गावातील शांती उपवन कॉम्प्लेक्समधील शांती एका विंगला तडा गेल्याने काल २४० कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. आपल्या राहत्या घराचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. संतापलेल्या कुटूंबातील नागरिकांनी बिल्डरच्या विरोध रोष व्यक्त करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटनमध्ये पुरातत्वविभागाला सापडलं ४ हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन प्रार्थनास्थळ, अधिकारीही चक्रावले २४० कुटुंबाला पालिका अधिकारी, अग्निशामक दल कर्मचारी, मनसे आमदार राजू पाटील आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी यांनी इमारतीच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था झाली असली तरी. मात्र आता पुढे काय करायचं? असा प्रश्न या रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे. तोंडावर होळी-रंगपंचमी हे सण आणि तर मुलाच्या परीक्षा चालू आहेत. यातच शनिवारी रात्री इमारतीला तडा गेला, रविवारी सुट्टीचा दिवस. मात्र सोमवारी मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुलांना शाळेत पाठवायचं कसं? असे अनेक प्रश्न निर्माण आता त्या कुटूंबातील लोकांसमोर उभे ठाकले आहेत.