काठमांडू: करोनाच्या संकटाशी दोन हात करण्याच्या मुद्यावर नेपाळ, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसोबत नुकतीच चीनने चर्चा केली. भारताविरोधात चीनने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा होती. भारताच्या शेजारच्या देशांना आपल्याकडे वळवून भारतावर दबाव टाकण्यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचे समोर आले होते. या बैठकीच्या दोन दिवसानंतर नेपाळने चीनसोबत की भारतासोबत राहणार याची भूमिका स्पष्ट केली आहे.

नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळ या चार देशांच्या गटाबाबतचा विचार धुडकावून लावला. चीनसह झालेली बैठक ही करोना संसर्गाच्या मुद्यावर होती. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश ‘सार्क’चे सदस्य आहेत. तर, चीन निरीक्षक आहे. त्यामुळे इतर नवीन गट बनवण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. नेपाळ हा गटनिरपेक्ष असून कोणत्याही देशाच्या गटात जाणार नसल्याचे संकेत दिले.

वाचा:

भारतावर साधला निशाणा

नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर नाराजी व्यक्त करताना टीका केली. करोना संसर्गाच्या काळात भारत हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह इतर देशांसोबत चर्चा करत आहे. मात्र, नेपाळसोबत एकदाही चर्चा केली नसल्याचे त्यांनी म्हटले. त्याशिवाय भारताने नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या राजकीय नकाशातील आठव्या आवृत्तीत नेपाळच्या हद्दीतील कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरी हा भाग भारताचा भूभाग म्हणून दाखवला. भारताने चर्चा नाकारल्यामुळे आम्हाला नवीन नकाशा प्रकाशित करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. भारतासोबत आम्ही चर्चा करण्यासाठी काही तारखाही कळवल्या. मात्र, भारताने आमच्या प्रस्तावावर काहीच उत्तर दिले नसल्याचेही नेपाळने म्हटले.

वाचा:

वाचा: भारत-चीन संबंधावर केले भाष्य

नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञावली यांनी सांगितले की, भारत आणि चीन यांच्यातील संबंधाचा परिणाम आशियावर पडणार आहे. वुहान शिखर परिषदेनंतर भारत-चीनमधील संबंध चांगले होते. मात्र, गलवानमधील घुसखोरीनंतर संबंध बिघडले असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देश तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करत असून मतभेद कशाप्रकारे दूर करतात, हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here