पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गुन्हे घडत आहेत. यामध्ये खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये लक्षणे वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. प्रेमसबंधांत वाद झाल्यानंतर तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या दरम्यान विजयने फिर्यादीशी बोलत असताना व्हिडिओ कॉल सुरू असताना बोलताना गुपचूप त्याचं स्क्रीनरेकॉर्ड केले. आणि अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर विजयने फिर्यादीचे हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामी केली आहे. हा प्रकार फिर्यादीला समजतात तिने पोलिसात धाव घेत विजयच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.