जळगावः भांडे विक्रेता तरुण हा कामानिमित्ताने सुरत येथे जाण्यासाठी निघाला. त्यासाठी पाचोरा येथून जळगावात येण्यासाठी मेमूट्रेनमध्ये बसला, जळगाव पोहचणार तोच या तरुणासोबत विपरीत घटना घडली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली ते जळगाव दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. इजास रसूल काकर वय २७ रा. वरखेडी ता. पाचोरा, असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इजास रसूल काकर (वय-२७) रा. वरखेडी ता.पाचोरा असे मृत तरूणाचे नाव आहे.

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे इजास रसूल काकर हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. भांडे विक्री करून आपला कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी इजास हा सुरतला जाण्यासाठी निघाला. सुरतला जाण्यासाठी जळगाव येथून रेल्वे असते, त्यामुळे इजास हा पाचोरा रेल्वेस्थानकावरुन जळगावात येण्यासाठी मेमू ट्रेनमध्ये बसला. रेल्वे प्रवासात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोली ते जळगाव रेल्वे रूळदरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने इजासचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाकडे असलेल्या मोबाईलवरुन त्याची ओळख पटली व तो वरखेडी येथील इजास काकर असल्याचे निष्पन्न झाले.

तरुणीला लॉजवर घेऊन गेला, मित्रालाही बोलवले, कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देत केलं भयंकर
कुटुंबियांना घटनेची माहिती देत पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला, कर्त्या तरुणाचा मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी शविविच्छेदन करून इजासचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत इजासच्या पश्चात आई जुबेदाबी, पत्नी रिजवानाबी, आठ महिन्याची मुलगी उमेन व भाऊ अरबाज असा परिवार आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन भावसार करीत आहे.

पुण्यात ते दोघे लिव्ह-इनमध्ये राहायचे, नंतर नात्यात दुरावा आला आणि तरुण नको ते करुन बसला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here