बीड : दिवसेंदिवस जिल्हाभरात छेडछाडीचे प्रकरण वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र, आता छेडछाडीचा प्रकार वाढून या प्रकाराने आता वेगळेच वळण घेतले आहे. माजलगाव इथे एक अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना तिचे व्हिडिओ चित्रीकरण करत असलेल्या मुलाच्या विरोधात माजलगाव ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

महाराष्ट्र हादरला! शाळेतून घरी आली की गप्प-गप्प होती चिमुरडी, वडीलांनी प्रेमाने विचारताच थरकाप उडाला
मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना माजलगावमध्ये अनिकेत अरुण मोरे नावाच्या २६ वर्षीय तरुणाने प्रकार केल्याने माजलगावात खळबळ उडाली आहे. माजलगाव शहरातील एक अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना आरोपी अनिकेतने तिचा व्हिडिओ काढला. मात्र, अल्पवयीन मुलीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने आपल्या घरच्यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. घरच्यांनीदेखील तात्काळ हा प्रकार गांभीर्याने घेत माजलगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.

Weather Alert : पुढचे २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे, ८ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात
पोलिसांनी तात्काळ अनिकेत अरुण मोरे या युवकाविरोधात गुन्हा दाखल करून त्या युवकाचा तात्काळ शोध घेतला. अशा प्रकारच्या घटना बीड जिल्ह्यात वारंवार होत आहे. त्यामुळे महिला आणि मुलींची सुरक्षा वाऱ्यावर आहे. यामुळे अशा नराधमांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनसामान्यातून पुढे येत आहे.

सीएसटीवरून थेट गाठा उरण; कधी सुरू होणार ट्रेन, कुठल्या स्थानकांवर थांबणार? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here