परभणी : पक्षाच्या कामानिमित्त मुंबईला गेलेल्या तालुकाप्रमुखाला झोपल्या ठिकाणी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजतात त्यांनी जे जे रुग्णालयाच्या प्रशासनाला संपर्क साधून तालुकाप्रमुखावर सर्वोत्तम उपचार करण्याचा सूचना दिल्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे तालुकाप्रमुख ज्ञानोबा माऊली फडके पक्षाच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते. रात्री झोपले असताना त्यांना झोपल्या ठिकाणी अचानक अर्धांगवायूचा अटॅक आला. त्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी जे जे रुग्णालयाच्या प्रशासनाची स्वतः फोनवरून संपर्क साधला. तालुकाप्रमुख फड यांच्यावर सर्वोत्तम उपचार करण्याचे आदेश दिले. यासोबतच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातील वैद्यकीय सहाय्यक सागर झाडे यांना जे जे रुग्णालयामध्ये पाठवून होत असलेल्या उपचाराची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे पुन्हा एकदा त्यांचे कौतुक होत आहे.

स्वतः मुख्यमंत्री घेत आहेत माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेही तालुकाप्रमुखावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती घेत आहेत. त्यामुळे तालुकाप्रमुखावर योग्य उपचार होण्यास मदत होत आहे.

बँकेची ४०९ कोटींना फसवणूक, आमदार रत्नाकर गुट्टेंसह कुटुंबीयांवर सीबीआयकडून गुन्हा
व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद

जे जे रुग्णालयात उपचार घेत असलेले गंगाखेड तालुका प्रमुख यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांनी तालुकाप्रमुखाशी संवाद साधत असल्याने त्यांना मोठा आधार मिळाला. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या तत्परतेची गंगाखेड तालुक्यात आता चांगली चर्चा सुरू झाली आहे.

समुद्रामार्गे साखरेची पाकिस्तान, श्रीलंकेत स्मगलिंग होतेय,अजित पवारांचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here