चेन्नई: तमिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात एक व्यक्ती निखाऱ्यांवरून चालता चालता पडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एका धार्मिक परंपरेदरम्यान हा प्रकार घडला. व्हिडीओमध्ये पिवळे कपडे परिधान केलेली एक व्यक्ती हिरवी पानं घेऊन निखाऱ्यांवरून चालताना दिसत आहे. दोन-चार पावलं चालताच तो अडखळतो आणि पुढच्या काही सेकंदांत निखाऱ्यांवर कोसळतो. सेलमच्या संकगिरीत ही घटना घडली आहे.

संकगिरीच्या मंदिरात एक उत्सव सुरू होता. अरसिरामणी कुमम्पट्टीच्या भद्रकाली अम्मान मंदिरात दरवर्षी उत्सव साजरा होतो. या उत्सवात आसापासच्या कित्येक गावांमधील शेकडो ग्रामस्थ सहभागी होतात. विविध प्रकारे देवीची प्रार्थना केली जाते. यामध्ये अनवाणी पावलांनी निखाऱ्यांवरून चालण्याच्या प्रथेचा समावेश आहे. निखाऱ्यांवरून अनवाणी चालणं पवित्र मानलं जातं.
शेजारणीला शॉक देऊन संपवत रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव; FB फ्रेंडसोबत पळाली, पण एक चूक नडली
मंदिराच्या उत्सवाला १७ फेब्रुवारीला सुरुवात झाली. ३ मार्चला अनेक भाविक निखाऱ्यांवरून चालण्यासाठी जमले होते. मंदिराच्या पुजाऱ्यांसोबत निखाऱ्यांवर चालण्याची प्रथा सुरू झाली. यात सर्वप्रथम पुजारी दोन्ही हातांमध्ये कलश घेऊन निखाऱ्यांवरून चालत होते. या प्रथेला ‘पुकारगम’ म्हणतात.
VIDEO: कॉलेजच्या वऱ्हांड्यात चालताना अडखळला, एकाएकी कोसळला; विद्यार्थ्याचा करुण अंत
पुजारी चालल्यानंतर एक-एक भाविक निखाऱ्यांवरून चालतात. या दरम्यान एका भाविकाचा तोल जातो आणि तो पेटत्या निखाऱ्यांवर कोसळतो. तो स्वत: उठूही शकत नाही. तिथे उपस्थित असलेले भाविक त्याला निखाऱ्यांवरून बाहेरच्या बाजूला खेचतात. भाविकाच्या अंगावर त्वरित पाणी टाकण्यात येतं. पेटत्या कोळशांवर पडल्यानं भाविकाला गंभीर स्वरुपाची इजा झाली. त्याला एडापाडी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here