शिक्षक उगले यांनी पत्नीला सावरगाव घाट येथून सोबत घेत कारमधून निघाले. दरम्यान, बीड सांगवी येथील महादेव दरा घाटात अज्ञात वाहनाने हुल दिल्याने ताबा सुटून कार खोल दरीत कोसळली. यात अंबादास पांडुरंग उगले यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सगुना या जखमी झाल्या.
दरम्यान, हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले, की या शिक्षकाच्या गाडीला हूल देणारी गाडी बेताल व वेगाने जात होती. तिने अचानक अंगावर येऊन हूल दिल्याने हा अपघात घडला.
सध्या अनेक जण भरधाव वेगात गाडी चालवून आपल्यासह इतरांच्या जीवाशी देखील खेळ करताना पाहायला मिळतात. मात्र यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे म्हणजे संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर येण्यासारखे होते. तरी देखील नागरिक भरधाव वेगात गाडी चालवताना दिसतात. घाटात देखील वेगाला आवर घालण्याचा प्रयत्न कधीच करत नाहीत, परिणामी अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागतेय.
या घटनेत शिक्षक मृत्युमुखी पडले असून त्यांची पत्नी जखमी अवस्थेत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या शिक्षकाच्या पक्षात त्यांची पत्नी, आई-वडील आणि मुलं असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोटासाठी जीव गमावला लागला; समृद्धीवर चहा विकायला गेला अन् अपघात झाला, अपघातांचा रनवे