नागपूर : विवाहित प्रेयसीला घरी भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या सासूवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही संतापजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली आहे. विनू (वय २८) असं आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनूचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र गावातील एका नातेवाईकाशी तिचे लग्न झाले. त्यामुळे विनूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी नवऱ्यासोबत गावात आनंदाने राहात आहे, हे विनूला आवडत नव्हते. त्याला दारूचे व्यसन जडले. त्यानंतर त्याने विवाहित मैत्रिणीला परत बोलावले. त्यामुळे लग्नानंतरही पतीपासून लपून तिचे विनूसोबत विवाहबाह्य संबंध होते. या सर्वाची विवाहित तरुणीच्या सासूलाही कल्पना होती. मात्र ती मूकबधीर असल्याने काही बोलू शकत नव्हती.

प्रेयसी दिवसा भिकारी बनून रेकी करायची आणि प्रियकर रात्री ते वाहन चोरायचा; का करायचे असं?

विनू अनेकदा त्याच्या विवाहित प्रेयसीला तिच्या सासूसमोरच भेटायला यायचा. विनूला भेटायला सासू नेहमीच विरोध करायची. मात्र सून हे विवाहबाह्य संबंध सोडायला तयार नव्हती. अखेर, आपल्या मुलाचे कुटुंब तुटू शकते, असे तिला वाटत असल्याने सासूनेही नंतर शांत राहणंच पसंत केलं. त्यामुळे विनूची हिंमत वाढली. सून आणि विनू घरात मूकबधिर सासूसमोर अश्लील कृत्ये करायचे.

दरम्यान, ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता विनू हा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी घरी आला. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. विकृत विनूने सुनेसमोर मुक्या सासूवर बलात्कार केला. त्यावेळी सुनेने आरोपी विनूला विरोध केला नाही. रात्री ८ वाजता सासूने आपल्या मुलाला घटनेची माहिती दिली. पत्नीची चौकशी केल्यानंतर त्यांनी मौदा पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी विनूला अटक केली. अटकेनंतर विनूने आपल्या कृत्याची कबुली दिली असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here