मुंबई: हिंडेनबर्ग अहवाल जेव्हा अदानी समूहासाठी जेव्हा काळ बनून आला होता. त्याचदरम्यान अमेरिकेमधून अदानी समुहासाठी एक दिलासादायक बातमी आहे. जेव्हा अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत होते, तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप १४७ अब्ज डॉलरवर आले होते. कंपनीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्यावेळी अमेरिकेतूनच एक चांगली बातमी आली. अमेरिकन बुटीक इन्व्हेस्टमेंट फर्म GQG Partners (GQG) ने अदानी ग्रुपच्या ४ कंपन्यांमध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या कंपनीचे मालक राजीव जैन यांनी अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी केली. हिंडेनबर्ग वादामुळे अदानी समूहावर प्रचंड दबाव असताना यूएस स्थित GQGने अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक केली. तसे पाहता GQG ने गुंतवणूक केलेली अदानी समूह ही एकमेव कंपनी नाही.
अदानी हिंडनबर्ग वादात रघुराम राजन यांची उडी; SEBI ची लुडबुड कशासाठी? उपस्थित केले गंभीर प्रश्न
अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ५ वर्षे प्रतिक्षा

राजीव जैन यांनी अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी जवळपास ५ वर्षे वाट पाहिली. अदानी शेअर्सचे मूल्यांकन पाहून ते थांबून होते, पण योग्य संधी मिळताच अणि अदानीच्या शेअर्सचे मूल्यांकन घसरताच, राजीव जैन यांनी विलंब न करता १५४४६ कोटी रुपये गुंतवले. GQG Partners ही गुंतवणूकदार फर्म आहे, जी ग्राहकांच्या वतीने बाजारात गुंतवणूक करते.

GQG शेअर्सच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, कंपनीकडे क्लायंटसाठी व्यवस्थापनाखालील ८८ डॉलर अब्जाहून अधिक मालमत्ता आहे. GQG जगभरातील ८०० संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करते. तसेच ग्राहकांसाठी आर्थिक सल्लागार म्हणून काम करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये पेट्रोब्रास ते एक्सॉन, एनव्हीडिया, स्नोफ्लेक, भारती, आयटीसी आणि लोटे या नावांचा समावेश आहे.

अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी पाच वर्षे वाट पाहिल्यानंतर कंपनीने अवघ्या दोन दिवसांत प्रचंड नफा कमावला. २ मार्च रोजी कंपनीने अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि दोन दिवसांत ३१०० कोटींचा नफा कमावला. राजीव जैन यांनी अडचणीत असलेल्या अदानी समूहात गुंतवणूक करून प्रचंड पैसा कमावला.

BoB बँकेची ग्राहकांना होळी भेट; घर खरेदी करणे स्वस्त झाले, वाचा काय आहेत नवे व्याजदर
GQG ला किती नफा

या कंपनीने अदानीचे शेअर्स सवलतीच्या दरात खरेदी केले आहेत. आता या अदानी शेअर्सच्या वाढीमुळे ते नफा कमवत आहे. कंपनीने अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १,४१०.८६ रुपयांनी विकत घेतले, दोन दिवसांत त्यामध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच या शेअरमध्ये राजिन जैन यांना १,८१३ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. त्याचप्रमाणे अदानी पोर्ट्सचे शेअर्स ५९६.२० रुपयांनी विकत घेतले गेले, जे दोन दिवसांत ६८४.३५ रुपयांवर गेले.

अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स ५०४.६ रुपयांना विकत घेतले, जे ५६२ रुपयांवर पोहोचले. त्याचप्रमाणे अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स ६६८.४ रुपयांना विकत घेतले गेले, जे दोन दिवसांत ७४३.७५वरुपयांवर पोहोचले. म्हणजेच १५,४४६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर अवघ्या दोन दिवसांत GQG चे गुंतवणूक मूल्य १८,५४८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दोन दिवसांत कंपनीला ३१०२ कोटी रुपयांचा नफा झाला.

कोट्यवधी नोकरदारांना बसणार जोरदार झटका, PF वरील व्याजदराच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार
राजीव जैन संकटकाळी संधी शोधण्यात माहिर

१९९६ मध्ये, आयटीसी कर संकटामुळे कठीण काळातून जात असताना, राजीव जैन यांनी आयटीसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. त्यांची आयटीसीमध्ये २० वर्षांपासून गुंतवणूक आहे. राजीव जैन यांनी स्वतः सांगितले की, कधी कधी संकटे तुमच्यासाठी संधी घेऊन येतात. या संधीचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे राजीव जैन यांना माहीत आहे. केवळ आयटीसीच नाही तर असे अनेक प्रसंग आले जेव्हा त्यांनी कठीण काळातून जात असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.

२०१९ मध्ये, जेव्हा व्हिसलब्लोअर प्रकरणामुळे इन्फोसिस कठीण काळातून जात होती, तेव्हा या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी केली होती. तो काळ होता जेव्हा इन्फोसिसचे शेअर्स प्रचंड घसरत होते. इन्फोसिसचे शेअर्स ३० ते ४५ टक्क्यांनी घसरले होते. अशा प्रकारे त्यांनी पेट्रोबारचे शेअर्स खरेदी केले. राजीव जैन म्हणाले की, कंपनीमध्ये भ्रष्टाचार, कर, राजकीय गतिरोध अशा अनेक समस्या आहेत हे आम्हाला माहीत होते, परंतु असे असतानाही आम्ही त्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. अनेक वेळा असे निर्णय फायदेशीर ठरतात आणि काही वेळा कंपनीला तोटाही सहन करावा लागतो. अदानीच्या बाबतीत, GQG चा मोठा फायदा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here