बीड: बीड शहरातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिराला खासबाग मंदिर देखील संबोधलं जातं. या मंदिरातील देवीच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे

बीड जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ काही थांबायचं नाव घेत नाहीये. कधी घरफोडी तर कधी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणे, तर कधी बेधडक दरोडे असे प्रकार सध्या वाढताना पाहायला मिळत आहेत. आता तर गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर म्हणजेच बीड शहरातील प्रसिद्ध खासबाग मंदिर या ठिकाणी तुळजाभवानीच्या गळ्यातील चोरट्यांनी मंगळसूत्र पळवला आहे.

धक्कादायक! लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले, नंतर अत्याचार केला, गर्भवती होऊनही मारहाण
गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या खासबाग मंदिरात प्रवेश करून आतील मंगळसूत्र पळवण्यापर्यंत आता चोरट्यांचे धाडस पोहोचल्याने आता पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न भाविक विचारात आहेत. ही चोरीची घटना कळल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या चोरीनंतर आता मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हा मंदिर परिसर किती सुरक्षित आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच मंदिराच्या बाजूने जाणारी बिंदूसरा नदीजवळ अनेक नशेखर नशा करताना पाहायला मिळतात. यातील नशेखोर हे गुंडगिरी खंडणी गोळ करणे असे प्रकार करत असतात. असे प्रकार नेहमीचेच सुरू असून याकडे पोलीस प्रशासन का लक्ष देत नाही असा प्रश्न स्थानिक लोकांनी प्रश्न उभा केला आहे.

कांद्यासाठी महसूलमंत्र्यासमोर गोंधळ; शेतकऱ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात हजर करणार
पोलिसांपुढे चोरांना पकडण्याचे आव्हान

आता या चोराला पकडणं सर्वात मोठं आव्हान आता या पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप या चोरीचा कशा पद्धतीने तपास लावणार हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं हे तुळजाभवानी चे मंदिर असल्याने क्षणातच वाऱ्यासारखी ही बातमी बीड जिल्ह्यात पसरली आहे. या घटनेमुळे भाविकांकडून संताप देखील व्यक्त केला जातोय.
वाचलो रे भावा! पाण्यात पडलेला मोबाइल सुकवण्यासाठी दुचाकीचा सीटवर ठेवला, पुढे जे घडले त्याने दुचाकीस्वार हादरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here