लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये एका विद्यार्थ्याचा झाडावरून पडल्यानं मृत्यू झाला आहे. उंची वाढवण्यासाठी विद्यार्थी झाडावर चढला होता. तितक्यात झाडाची फांदी तुटली आणि विद्यार्थी जमिनीवर कोसळला. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शोकाकुल वातावरणात मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमरोहाच्या रहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रहरुई गावात ही घटना घडली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत झाडावर खेळत होता. तो शंभू इंटरकॉलेज आदमपूरमध्ये अकरावीत शिकत होता. अकरावीत शिकत होता.त्याची उंची फार नव्हती. उंची वाढवण्यासाठी तो झाडाला लटकून व्यायाम करत होता. कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीला धरून त्याची कसरत सुरू होती.
शेजारणीला शॉक देऊन संपवत रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव; FB फ्रेंडसोबत पळाली, पण एक चूक नडली
फांदीला लटकलेला विद्यार्थी अचानक कोसळला. झाडाच्या खाली सुकलेली मुळं होती. या मुळांवर कोसळल्यानं विद्यार्थी गंभीर जखमी झाला. विद्यार्थ्यासोबत खेळत असलेल्या मुलांनी आरडाओरडा केला. तेव्हा जवळच असलेले शेतकरी मदतीला धावले. कुटुंबीयांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्याला आदमपूरमधील डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीशिवाय मृत विद्यार्थ्यावर त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.
लग्न तोंडावर, वधू पार्लरमध्ये; मेकओव्हरनं चेहरा काळवंडून सुजला; नवरदेव म्हणतो, मी तर…
मृत विद्यार्थी शंभू इंटर कॉलेज आदमपूरमध्ये अकरावीत शिकत होता. त्याची उंची कमी असल्यानं तो सातत्यानं व्यायाम करायचा. शेताजवळ असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला लटकून विद्यार्थी व्यायाम करत होता. त्यावेळी त्याचं लक्ष खाली असलेल्या सुकलेल्या मुळांकडे गेलं नाही. मुळांमुळे त्याच्या पोटाला गंभीर इजा झाली. मृत विद्यार्थ्याच्या आईचं १२ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. मृताच्या कुटुंबात दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. मृत विद्यार्थ्या भावंडांमध्ये तिसरा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here