सध्याचं राज्याचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. जिथं तिथं राजकारणाची चर्चा पाहायला मिळते. मात्र, यावर्षी राजकीय व्यासपीठावर गाजलेलं वाक्य म्हणजे 50 खोके एकदम ओके होय. गद्दार हा शब्द प्रत्येक वेळेस राजकीय पटलावर पाहायला मिळतोय. याचाच परिणाम काही चिमुकल्यांवर देखील झालेला पाहायला मिळतो. याचाच प्रत्यय बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात चिमुकल्यांनी साजरी केलेली होळी पाहून आला आहे.
परळीत काही चिमुकल्यांनी एकत्र येत अंगावर आणि पाठीवर गद्दार पन्नास खोके एकदम ओके असं लिहीत होळीच्या बोंबा मारण्याऐवजी चक्क घोषणाबाजी करत ही होळी साजरी केली आहे. यामुळे या चिमुकल्यांनी सध्या नागरिकांचे लक्ष वेधलं आहे. या चिमुकल्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वर्षभरातील तापलेले राजकारण यात आरोप प्रत्यारोप राजकीय पटलावर चांगल्याच गाजलेला पाहायला मिळाले.
प्रत्येक ठिकाणी राजकीय चर्चा आणि सतत त्याच गोष्टी याचा परिणाम म्हणून आता यात चिमुकल्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहेत. राजकारण समाजकारणाचा कसलाही गंध नसलेल्या चिमुकल्यांनी होळीत केलेला हा प्रताप सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतं आहे. सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.