सोशल मीडियावर झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एका केलीय. मारहाण करण्यात आलेला २५ वर्षांचा तरुण हा मेवातच्या लुकमानचा रहिवासी आहे. तो मांस विक्रीचा व्यवसाय करतो. पोलिसांच्या उपस्थितीत त्याला मारहाण कशी झाली? असा प्रश्न उपस्थितीत करत अनेकांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
जखमी लुकमाननं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.०० वाजल्याच्या दरम्यान सेक्टर ४-५ मधल्या चौकात तो पोहचला होता. त्याच्या पिकअप व्हॅनमध्ये भरलेलं होतं. याचवेळी पाच दुचाकींवरून आलेल्या काही तरुणांनी त्याला रोखलं.
वाचा :
वाचा :
ते जवळपास ८-१० लोक असतील. त्यांनी आरडा-ओरडा करत प्रथम गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू लक्षात आल्यानंतर मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुंडांनी सदर बाजारात गाठलं आणि गाडीतून खेचून बाहेर काढलं, अशी माहिती लुकमाननं दिलीय. गुंडांच्या हातात असलेल्या हातोडीनं लुकमानवर वार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, ही मारहाण सुरू असताना काही पोलिसही घटनास्थळी उपस्थित झाले होते परंतु, त्यांनी लुकमानला वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही बघ्याची भूमिका घेतली.
मारहाणीनंतर गुंडांनी लुकमानला गाडीत टाकून सोहनाकडे नेलं. पोलिसांच्या एका टीमनं ट्रकचा पाठलाग करून लुकमानची सुटका केली. यावेळी, आरोपींनी पोलिसांवरही हल्ला केल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी लुकमानला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या गाडीतील मांस जप्त करून फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलंय.
लुकमानच्या शरीरावर हातोडीनं हल्ला केल्यामुळे त्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओत आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम १४७, १४८, १४९, ३२३, ३२५, ३४१, ३४२ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times