मुंबई : लिंगबदल शस्त्रक्रिया केलेल्या महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. ३७ वर्षीय महिलेने राहत्या घरातील सीलिंग फॅनला गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. महिला एका टीव्ही स्पोर्ट्स चॅनेलसोबत काम करत होती.

मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात यशवंत नगर येथे रविवारी महिलेने गळफास घेतला. पुरुष म्हणून जन्म घेतल्यानंतर २०१८ मध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया करत या व्यक्तीने महिलेचं आयुष्य जगण्यास सुरुवात केली होती.

लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतरही कोणी आपल्याला स्वीकारत नाही किंवा आपल्याला महिलेप्रमाणे वागणूक देत नाही, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे ती मानसोपचार तज्ज्ञांकडे ट्रीटमेंटही घेत होती, अशी माहिती गोरेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

गोरेगाव पश्चिम भागात यशवंत नगर येथे ती एका मित्रासोबत राहत होती. २०१९ पासून जवळपास साडेतीन वर्ष ते एकत्र राहत होते. रविवारी दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास तिचा मित्र सलूनमधून घरी आला, तेव्हा दरवाजा आतून बंद असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

बाईकस्वाराने नदीजवळ पाहिलं, गुरुजी विव्हळत पडलेले; शाळेच्या वाटेवर शिक्षकाला मृत्यूने गाठलं
मित्राने महिलेला दरवाजा उघडण्याची विनंती केली, मात्र बराच वेळ वाट पाहून, हाका मारल्यानंतरही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने चावीने दरवाजा उघडला, तेव्हा महिला रुममधील सीलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

बाबा, अजय बघा काहीतरी टोचून घेतोय, लेकीचा कॉल; नवऱ्यापाठोपाठ बायकोनेही स्वतःला संपवलं
पोलिसांनी महिलेचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गरज माणसाला काय करायला लावेल? कर्ज फेडण्यासाठी चक्क रस्त्याच्या बांधकामाचा जेसीबीच चोरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here