कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १८९९ सभासद साखर सहसंचालकांनी वैध ठरवल्याने महाडिक गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील गटाला हा धक्का समजला जातो.

राजाराम कारखान्याच्या मतदार यादीवर दोन्ही बाजूने हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांच्यासमोर दिनांक १ मार्च रोजी सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंनी आपले मत मांडले होते. सदर सुनावणीचा निकाल आज देण्यात आला. यामध्ये १८९९ सभासदांवर विरोधी सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवलेला होता. पण सुप्रीम कोर्टानंतर आता प्रादेशिक सहसंचालकांनीही पुन्हा एकदा हा आक्षेप फेटाळून लावल्याने व हे सभासद निवडणुकीत मतदानास पात्र झाल्याने हा निर्णय म्हणजे सतेज पाटील गटासाठी मोठा धक्का आहे.

कसबा जिंकलं अन् अजित पवारांनी गुपित फोडलं, भाजपमधले ४० ते ४५ आमदार….
त्याचप्रमाणे विरोधी आघाडीकडून सौ. शौमिका महाडिक यांच्या संस्था गटातील ठरावाबाबत नोंदवलेला आक्षेपही प्रादेशिक सहसंचालकांनी फेटाळून लावले. सदर १८९९ सभासदांचा प्रश्न राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच गाजला होता. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी सभासदांचे हक्क अबाधित ठेवले होते. त्यानंतर पुन्हा विरोधी आघाडीने याच सभासदांवर आक्षेप घेतल्याने सदर निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सुनावणीदिवशीही मा.प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयाबाहेर सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती.

कोमात गेलेल्या पुत्रावर गुन्हा, गडाख म्हणतात, तो आजारी नसता तर त्याने तुमची भिंगरी केली असती!
ज्या पद्धतीने सप्तगंगा साखर कारखान्याचे ५००० सभासद एका रात्रीत कमी केले, आणि तिथला सहकार संपवून टाकला. त्याच पद्धतीने राजाराम कारखान्यातही सभासद कमी करून सत्ता घ्यायची आणि सहकार संपवायचा असाच आमच्या विरोधकांचा कुटील डाव होता. पण कोणत्याही परिस्थितीत राजाराम कारखान्याच्या सर्व सभासदांचे हक्क अबाधित ठेवायचेच या भावनेतून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला होता. त्या लढ्याला आज पुन्हा एकदा यश आले, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here