मुंबई : तिला चोरी रोखण्यासाठी एक आयडिया सुचली, मात्र हीच भन्नाट कल्पना वाटली, तिच्या अंगलट आली. नालासोपाऱ्यातील एका किराणा दुकानाची मालकीण रोज रात्री दुकान बंद करताना खिडकीच्या लोखंडी ग्रीलला विद्युत तार लावून ठेवायची. मात्र महिलेच्या या भलत्या कल्पनेने एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. तुळींज पोलिसांनी एक मार्च रोजी तिच्यावर गुन्हा दाखल केला

२५ जानेवारी रोजी संबंधित दुकानाच्या खिडकीजवळ १८ वर्षांचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. जेव्हा मुलाच्या आईने त्याच्या शरीराला स्पर्श केला, तेव्हा तिला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली.

तुळींज पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी महिनाभराच्या तपासानंतर, तसेच वीज वितरण कंपनीचा सविस्तर अहवाल, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी आता दुकान मालकिणीवर गुन्हा दाखल केला आहे. मीरा संजय कांडू असं ४२ वर्षीय महिलेचं नाव आहे.

चोरीपासून बचाव करण्याचा उपाय म्हणून मीरा कांडूने दुकानातील खिडकीच्या लोखंडी ग्रीलला विजेची तार जोडली होती. करोना काळात काही चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून मौल्यवान वस्तू, रोख रक्कम आणि काही किराणा सामान चोरल्यामुळे तिने उपाययोजना केल्याचं वृत्त मिड डे वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.

दुकानाच्या मालकिणीने खिडकीतील लोखंडी ग्रीलला थेट विजेच्या मीटरवरुन विजेची तार जोडण्याचा निर्णय घेतला. मात्र चोरी रोखण्याच्या उद्देशाने केलेली ही उपाय योजना जीवघेणी ठरली आणि एका किशोरवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागला, असे तुळींज पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

२४ जानेवारीच्या संध्याकाळी संबंधित अल्पवयीन मुलगा घराबाहेर पडला होता, मात्र रात्री उशीर होऊनही तो परतला नव्हता. रात्रभर शोधाशोध केल्यानंतर तो कुठेच सापडला नाही. त्यावेळी किराणा माल दुकानाच्या समोर एक अल्पवयीन मुलगा पडल्याची माहिती त्याच्या आईला कुठून तरी समजली.

मृतदेह पाहण्यासाठी जड पावलांनी आई गेली. जेव्हा आईने त्याच्या शरीराला स्पर्श केला, तेव्हा तिला विजेचा धक्का बसला, असे पोलिसांनी सांगितले. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना बोलावले.

सर्वांच्या सुखदुःखाला धावणारा गणेश गेला, बाईक अपघात मृत्यू, चिमुकल्यांचं पितृछत्र हरपलं
किराणा दुकानाच्या खिडकीतील लोखंडी जाळीला जोडलेली विजेची तार सोडवून मृतदेह विलग करण्यात आला. शवविच्छेदनात मुलाचा मृत्यू विद्युत शॉकने झाल्याचे स्पष्ट झाले. एमएसईबीचा अहवाल आणि पोस्टमार्टमच्या आधारे आम्ही दुकान मालकावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

झोपेत अंदाज चुकला, गच्चीवरुन थेट खाली पडून तरुणाचा मृत्यू, नातवाला पाहून आजीचा आक्रोश
पोलिसांनी महिलेला अटक केली नसून तिला न्यायालयात हजर राहण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली असल्याने तिला अटक करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. मृत मुलाच्या पश्चात त्याची आई आणि बहीण असा परिवार आहे.

आजोबांनाही गौतमी पाटीलच्या डान्सची भुरळ; डान्स सुरू होताच शिट्टी मारली, तरूणांचा जल्लोष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here