मयत किरण गुंजाळ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. किरणच्या लहान भावाचा देखील २०१८ साली खून झाल्याची माहिती मिळाली आहे. किरण हा दिंडोरी रोडवरच असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची विक्रीचा व्यवसाय करत होता. तो पेठ रोड भागातील शनी मंदिर परिसरातील रहिवासी होता. पूर्ववैमान्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खुनाची घटना घडल्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. संशयित हल्लेखोर हल्ला केल्यानंतर फरार झाले असून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, सणाच्या दिवशी नाशिक शहरात सायंकाळच्या वेळी भररस्त्यात रहदारीच्या ठिकाणी तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याने परिसरातील व्यवसायिकांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली पासून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत हत्येच्या तपासासाठी पथक नेमण्याची सूचना केली आहे.