‘काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार, ‘द नॅशनल डिफेंस फोर्स’ने एका विधेयकाचा मसुदा सादर केला आहे. या मसुद्यानुसार, नेपाळ आर्मी कायद्याला बदलता येणार आहे. नेपाळच्या लष्कराने आपल्या कल्याणकारी निधीला वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायात ‘प्रमोटर’ म्हणून गुंतवणूक करण्यास कायदेशीर सल्ला मागितला आहे. यासाठी नेपाळी लष्करी अधिकारी मागील वर्षापासून प्रयत्न करत आहेत.
नेपाळ लष्कराचे कायदेशीर प्रभारी रंत प्रकाश थापा यांनी सांगितले की, त्यांच्या प्रस्तावित विधेयकाला सरकारची मंजुरी मिळेल. नेपाळच्या प्रस्तावित कायद्यानुसार, लष्कराला उद्योग, कंपनी आणि जलविद्युत प्रकल्पासारख्या पायाभूत प्रकल्पात गुंतवणूक करण्यास निर्बंध आहेत. नेपाळी लष्कराला राष्ट्रीय सुरक्षा, गुप्त माहिती संकलित करणे या कामांपेक्षा उद्योगांमध्ये अधिक रस दिसत असल्याचे संरक्षण तज्ञांनी सांगितले.
वाचा:
नेपाळचे संरक्षण तज्ञ गेजा शर्मा यांनी सांगितले की, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. लष्कर जेवढ्या अधिक प्रमाणात इतर कामांमध्ये सहभागी होईल, तेवढ्याच प्रमाणात लष्करावर परिणाम होईल. नेपाळमध्ये माओवादी हिंसाचारा दरम्यान नेपाळी सैन्य रस्ते बांधणीच्या कामात होती. मात्र, हिंसाचार संपल्यानंतरही लष्कर रस्ते बांधणीच्या कामात आहे. नेपाळी सैन्याकडून गॅस स्टेशन, शाळा, वैद्यकीय महाविद्यालये चालवण्यासह बाटलीबंद पाणी विक्री करण्यात येते.
वाचा:
नेपाळी सैन्याला काठमांडू-तराई एक्स्प्रेसवेचे कंत्राट मिळाले आहे. त्यावरही नेपाळमध्ये टीका केली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला ही ‘वेल्फेअर फंड’साठी केली जात असल्याचे नेपाळी सैन्याने म्हटले. नेपाळी सैन्याने १९७५ मध्ये सैनिकांसाठी कल्याणकारी निधीची सुरुवात केली होती. नेपाळ सैन्याच्या या कल्याणकारी निधीमध्ये ४५.८६ अब्ज रुपये जमा झाले आहेत. त्याशिवाय, ५.४ अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. नेपाळी सैन्याच्या कल्याणकारी निधीत मागील वर्षात ७.२९ अब्ज रुपयांची वाढ झाली आहे.
वाचा:
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तानमध्ये आपले एक विशाल उद्योग साम्राज्य उभे केले असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानमधील जवळपास ५० हून अधिक उद्योग-व्यवसाय आणि गृहनिर्माण संस्थांची मालकी पाकिस्तानी लष्कराच्या विविध व्यावसायिक आस्थापनांकडे आहे. पाकिस्तान लष्कर फौजी फाउंडेशन, शाहीन फाउंडेशन, बहरिया फाउंडेशन, आर्मी वेल्फेअर ट्रस्ट आणि डिफेंस हाउसिंग प्राधिकरणाद्वारे आपले उद्योग साम्राज्य चालवते.
आशिया टाइम्सच्या वृत्तानुसार, २०१६ मध्ये पाकिस्तान लष्कराकडून चालवण्यात येणाऱ्या उद्योग-व्यवसायाची किंमत ही २० अब्ज डॉलर (सुमारे १४०० अब्ज भारतीय रुपये) होती. मागील तीन वर्षात याची किंमत आता १०० अब्ज डॉलरने वाढली आहे. पाकिस्तानी लष्कराकडून चालवण्यात येणार उद्योग-व्यवसाय हे इतर सरकारी कंपन्यांना असणाऱ्या जबाबदारीतून मुक्त आहेत. पाकिस्तान लष्कर बँकिंग, फूड, रिटेल, सिमेंट, रिअल इस्टेट, विमा, खासगी सुरक्षा आदी क्षेत्रातील उद्योग, व्यवसायात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
A big thank you for your article.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.