मुंबई: आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आंदोलकांसाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेली योजना बंद करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. ‘ज्यांनी यांच्या नावानं शपथ घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार,’ असा खोचक टोला भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हाणला आहे. (BJP MLA attacks Thackeray Sarkar over scraping emergency pension scheme)

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींसाठी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मानधन योजना सुरू केली होती. १९७५ ते १९७७ या काळात तत्कालीन सरकारविरुद्ध लोकशाहीसाठी लढा देताना तुरुंगात गेलेल्यांसाठी ही योजना होती. एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मसिक दहा हजार व त्यांच्या पश्च्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस पाच हजार व एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक रुपये पाच हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस रुपये अडीच हजार रुपये मानधन सुरू करण्यात आले होते.

वाचा:

जानेवारी २०१८ पासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली. राज्यातील ३२६७ जणांना याचा लाभ मिळाला होता. यासाठी २९ कोटी रुपयांचे वितरणही झाले होते. कागदपत्रे नसतील तर केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारे या योजनेचा लाभ मिळत होता. आणीबाणी लागू करण्यास तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाला जबाबदार मानले जाते. विशेष म्हणजे त्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांमध्ये भाजप आणि संघ परिवारातील व्यक्तींची संख्या अधिक होती. त्यांचा सन्मान करण्यासाठी मागील सरकारने ही योजना सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यापासून या योजनेला विरोध सुरू झाला होता. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी उघडपणे ही योजना बंद करण्याची भूमिका घेतली होती. राज्याच्या विधी व न्याय विभागाकडूनही प्रतिकूल मत नोंदविण्यात आले होते. तेव्हापासून योजना बंदच करण्याचे घाटत होते. अखेर करोनामुळं आलेल्या आर्थिक संकटाचे कारण देऊन सरकारनं ही योजना गुंडाळली आहे. तसे परिपत्रक काढण्यात आलं आहे.

वाचा:

सरकारच्या या निर्णयावर आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी तिन्ही पक्षाचे आमदार फुटू नये म्हणून सर्व आमदारांना तिन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या नावानं शपथ देण्यात आली होती. नेते व आमदारांनी सोनिया गांधी यांच्या नावानं शपथ घेतल्यानं प्रचंड टीकाही झाली होती. बंद झाल्यानंतर तोच संदर्भ देत शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘ज्यांनी सोनियाजी गांधी यांच्या नावाने शपथ घेतली, ते इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्या आंदोलकांना पेन्शन कशी देणार? भले यातील बहुसंख्य आंदोलक मराठी असले तरी…,’ असं शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘देशप्रेमी आंदोलकांनो, राज्य सरकारला प्रश्न पैशांचा नसावा. प्रश्न तत्वाचा असू शकतो,’ असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here