रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनाप्रतिबंधक लस तयार करण्यात सहभागी असणाऱ्या शास्त्रज्ञांतील एक अँड्रे बोतिकोव्ह यांची त्यांच्या घरात पट्ट्याने गळा आवळूनन हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, अँड्रे बोतिकोव्ह यांची हत्या का करण्यात आली याचा खुलासा करण्यात आला आहे.

गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथमॅटिक्स’मध्ये काम करणारे वरिष्ठ शास्त्रज्ञ बोतिकोव्ह (४७) गुरुवारी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले, असे वृत्त येथील वृत्तसंस्थेने रशियाच्या तपास समितीच्या हवाल्याने दिले आहे. बोतिकोव्ह हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. २०२०मध्ये स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या १८ शास्त्रज्ञांपैकी एक ते होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०२१मध्ये करोना लशीवरील कामासाठी बोतिकोव्ह यांचा ‘ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड’ पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

पोटच्या मुलांनी वृद्धाश्रमात टाकलं, बापाने धडा शिकवला, करोडोंची संपत्ती सरकारला केली दान
रशियन तपासयंत्रणांनी संशयित तरुणाला कोर्टात हजर केले असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला कोर्टाने २ मेपर्यंत ताब्यात ठेवण्याचा आदेश दिला आहे. आरोपी हा २९ वर्षांचा असून त्याच्यानावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आरोपीचे आणि बोतिकोव्ह यांचे एका चर्चेच्या वेळी वादा-वादी झाली आणि भांडणादरम्यान तरुणाने त्यांचा पट्ट्याने गळा आवळला आणि पळ काढला, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बळीराजांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला! अवकाळीचा जिल्ह्यात कहर; उभी रब्बी पिके झाली अडवी
आरोपीचे नाव अॅलेक्सी व्लादिमिरोविच जमनोव्स्की असं असून त्याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला रशियन कायद्यानुसार १५ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. सध्या त्याला २ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अवकाळी पावसाच्या धुळवडीने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; अमरावतीत मुसळधार पाऊस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here