म.टा. प्रतिनिधी, नागपूर

धुळवडीला दारू पिऊन चौकात अथवा मोटारसायकल चालविताना हुल्लडबाजी करणाऱ्यांना थेट पोलिस कोठडीत डांबण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी उपराजधानीत चार हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून, दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली.

होळी व धुळवड शांततेत पार पडावी, यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांची धरपकड करण्यात येत असून, दोन दिवसांत चार गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेचीही कारवाई करण्यात आली. उपराजधानीत ६० ठिकाणे अत्यंत संवेदनशील आहेत. या ठिकाणी दोन दिवस पोलिस तळ ठोकून (फिक्स पॉइंट) राहणार आहेत. याशिवाय ४० ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी, तर दारू पिऊन वाहनचालविणाऱ्यांविरूद्ध ४० चौकांत वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत.

होळी खेळायला जाताय? रंग खेळण्याआधी आणि नंतर अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी…
बंदोबस्तात सात पोलिस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ४० पोलिस निरीक्षक, २०८ सहायक निरीक्षकांचाही समावेश आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांविरुद्धही मोठ्या प्रमाणात कारवाई केली. धुळवडीला पाण्याने भरलेले फुगे फेकून मारणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. रंगोत्सव आनंदाने साजरा करावा. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. नागपूरकरांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.

राज्याची चिंता वाढली! विचित्र साथीचं थैमान, गांभीर्याने घ्या ही लक्षणं; वाचा व्हायरसवरील उपाय…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here