पाटणा : अभिनेता मृत्यू प्रकरणाबाबत बिहारचे यांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिलीय. एका न्यूज चॅनलशी बोलताना, सुशांतच्या वडिलांनी मागणी केली तरच सीबीआय चौकशी शक्य असल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलंय. मुंबई पोलिसांनी पोलिसांना चौकशीत सहकार्य करायला हवं, असंही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी या प्रकरणाचा गुन्हा बिहारमध्ये दाखल केलाय. पोलिसांचं काम आहे त्यावर तपास करणं… ज्यांनी ही तक्रार दाखल केलीय त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली तरच राज्य सरकार पुढे काही कारवाई करू शकेल. या चौकशीत दोन राज्यांच्या भांडणाचा प्रश्नच येत नाही. परंतु, सुशांतच्या वडिलांनी मागणी केली तर सीबीआय चौकशी शक्य आहे, असं नितीश कुमार यांनी म्हटलंय.

बिहार पोलिसांचा जॅग्वार, बीएमडब्ल्यू प्रवास चर्चेत

दरम्यान, या प्रकरणाचा राजकीय वापर करण्यासाठी पावलं पडत असल्याचं म्हटलं जातंय. सुशांतसिंह राजपूत हा बिहारचा असल्यामुळे त्या राज्यात हे प्रकरण खूपच तापलंय. बिहारच्या पोलिसांनी मुंबईत येऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे जॅग्वार, बीएमडब्ल्यू या महागड्या गाड्यांमधून मुंबईत फिरत आहेत, अशी क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. आता, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही या प्रकरणात अधिक लक्ष घातलेलं दिसतंय.

शनिवारी बिहार पोलिसांनी मुंबईतील कुपर रुग्णालयात जाऊन सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मागितला. परंतु, इथं त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही, असं बिहार पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती मिळतेय.

वाचा :

वाचा :

बिहारमध्ये प्रचाराचा मुद्दा?

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीच्या दृष्टीने या प्रकरणाकडे बघितलं जातंय. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सरकार आहे. त्यामुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास हे सरकार योग्य पद्धतीने करत नाही, असा ठपका ठेवून या प्रकरणाचा राजकीय लाभ घेतला जाण्याची रणनीती या मागे असू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. बिहार निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दाही होऊ शकतो, असंही म्हटलं जातंय.

मनी लाँड्रिंगचा गुन्हा

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून बिहार पोलिसांनी सुशांतसिंह याची मैत्रीण हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर ‘ईडी’ने शुक्रवारी बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे या प्रकरणी सुशांतसिंह याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला. रियाने सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये बेनामी खात्यांकडे वळते केल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलंय. बिहार पोलिसांच्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर तसंच सुशांत सिंहचं उत्पन्न, बँक खाती आणि कंपन्यांविषयी स्वतंत्र माहिती गोळा केल्यानंतर ईडीने रिया, तिचे कुटुंबिय आणि अन्य सहा जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अन्य एक एफआयआरदेखील ईडीच्या चौकशीचा भाग असेल, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here