सातारा : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द गावाजवळ असलेल्या दोस्ती ढाब्याजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोन्ही युवक जागीच ठार झाले आहेत. सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघाताची नोंद करण्याचे काम वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आनेवाडी टोल नाका चुकवण्यासाठी सातारा-लोणंद व फलटण या मार्गावरून कंटेनर, मालवाहतूक करणाऱ्या गाड्याही मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. अपघाताचे प्रमाण या मार्गावर जास्त आहे. पाडेगाव (ता. खंडाळा) येथील स्वराज स्वरूपकुमार जानकर (वय २३) हा बुलेटवरून (एम. एच. १२ टी. ई. ३००६) पाडेगावकडे निघाला होता. हा सातारा येथे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होता. तो आपले काम आटोपून पाडेगाव गावी निघाला होता, तर सुभाष अनिरुद्ध शिंदे (रा. बलवडी, जि. सोलापूर) हा युनिकॉर्न मोटारसायकलवरून (एम. एच. ४५ ए. एस. ३९३४) साताऱ्याकडे येत होता.

साताऱ्यात दोन गटात राडा, तलवारीनं हल्ला, घरासह जीप पेटवली, फलटणच्या मिरेवाडीत थरार

दोस्ती ढाब्याजवळ आल्यानंतर या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. परस्पर विरोधी दिशेने चाललेले हे दुचाकीस्वार वेगात असल्याने धडक इतकी जोरात होती, की धडकेच्या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळी दाखल झाले. या धडकेत अपघातस्थळापासून मोटारसायकलस्वार २० ते २५ फुटावर फरफटत गेले. अपघातात दोघांना गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले.

दरम्यान, स्थानिकांकडून तातडीने वाठार स्टेशन पोलिीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here