मॅथ्यूज आणि ब्रटने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला यामुळे मुंबईने ही लढत ८६ चेंडूत जिंकली. मॅथ्यूजने ३८ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. यात १३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तर ब्रटने २९ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ११४ धावांची भागिदारी केली.
मुंबई इंडियन्सची धमाकेदार फिल्डिंग
आरसीबीने डावाची सुरूवात चांगली केली होती. पण मुंबईच्या गोलंदाजांनी नंतर कमबॅक केले. याला फिल्डर्सनी सुरेख साध दिली. आरसीबीकडून चांगली फलंदाजी करणाऱ्या एलिसा पॅरीला मुंबईच्या फिल्डर्सनी धावबाद केले. सामन्यातील ९व्या षटकात एक धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॅरीला हुमायरा काजीने डायरेक्ट थ्रो मारला आणि धावबाद केले.
स्पर्धेत याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी पराभव केला होती. महिला टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा विचार करता हा सर्वात मोठा विजय ठरला. दुसऱ्या बाजूला आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. याआधी पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा ६० धावांनी पराभव केला होती. सलग दोन विजयानंतर मुंबई इंडियन्स गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी दिल्ली तर तिसऱ्या स्थानी युपी वॉरियर्सचा संघ आहे. आरसीबी आणि गुजरात यांनी त्यांच्या पहिल्या दोन्ही लढती गमावल्या असून ते चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.