एकंदरीत पेपरफुटीचा तपास एसआयटी मार्फत होणार असल्याने या पेपरफुटी प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत कशा पद्धतीने आणि तेही कमी वेळेत पोहोचणार हे एक मोठं आव्हान एसआयटीसमोर असेल. जे आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतले आहेत त्यामध्ये काही खासगी शिक्षण संस्थातील शिक्षक देखील आहे. व त्याच परिसरातील काही इसम कार्यरत आहेत. नेमका कसा हा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला आणि त्याचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे पोलीस सूत्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
अतिशय गोपनीय पद्धतीने हे सर्व पेपरफुटीचे प्रकरण गृह विभागाकडून हाताळले जात आहे. या प्रकरणाने राज्य सरकारचा शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. सुरुवातीला अतिशय हलक्यात घेणाऱ्या या पेपरफुटीला आता एसआयटीकडे वर्ग करण्यात येत असल्याने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. निश्चित यामध्ये काहीतरी मोठे रॅकेट सक्रिय असू शकते का? हा शोध घेतला घेतल्या जाईल.
अमरावती विभागाचे सचिवांनी पत्रक काढून सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 601 602 6060 609 या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकात तात्काळ बदल करून इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश निर्गमित करण्यास सांगितले आहे. तसेच तालुक्यातील बारावीच्या केंद्र संचालकांनी तीन मार्चला संध्याकाळी तात्काळ बैठक घेऊन तेजराव काळे सहसचिव विभागीय परीक्षा मंडळ अमरावती यांच्या उपस्थितीमध्ये केंद्र अध्यक्ष व रनर यांनाही सूचना दिल्या आहेत. केंद्र अध्यक्ष तसेच रनर यांची काळजी घेऊन परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी. तसेच परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भयमुक्त, कॉपी मुक्त परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली आहे. गृह विभागापाटोपाठ शिक्षण विभागानेही अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत. सर्व त्या उपाययोजना करत कॉपीमुक्त सरकारच्या अभियानाला यापुढे कुठे सुरंग लागू नये, याची काळजी घेत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजामध्ये बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. बारावी गणित पेपरफुटीच्या प्रकरणात आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. एसआयटीचे हे पथक मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येणर आहे. या पथकात साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे, सुरजसिंग राजपूत, प्रदीप सोभागे यासह मेहकर, लोणार, बिबी, सिंदखेडराजा येथील पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे.