प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे ८ फेब्रुवारी रोजी हल्ला झाला होता. याप्रकरणी कसबे धावंडा येथील महेंद्र तुकाराम डोंगरदिवे या हल्लेखोराला ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा ही दाखल केला होता. न्यायालयासमोर उभे केले असता त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली असून,त्याची परभणी कारागृहात रवानगी झाली आहे.
पोलिसांनी तपासाअंती सांगितलं कारण
आमदार सातव यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात विधानपरिषदेत आवाज उठवला होता.कोणाच्या तरी सांगण्यावरून राजकीय हेतूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी कसबे धावंडा येथे जाऊन तेथील लोकांना विचारपूस केली.आरोपीची पार्श्वभूमी, त्याचा राजकीय पक्षाशी संबंध आहे काय, त्याने कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला का…? याबाबत चौकशी करण्यात आली. याशिवाय महिला अंगरक्षकाचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासानुसार आरोपी शेळीपालन व मजुरी करतो. तो दारू पिण्याच्या सवयीचा असून, घरात नेहमी वाद करतो, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही अथवा राजकीय पक्षाशी संबंध नाही.त्याने कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला नसेल त्यांच्याकडून दारूच्या नशेत हा गुन्हा घडल्याचे समोर आले आहे.हा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले.सातव यांच्या वरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापू लागले होते.
देवेंद्र फडणवीस अनाजीपंत,मोहित कंबोजला त्यांचीच साथ; भास्कर जाधवांची सडकून टीका