देहू, पुणे : तब्बल २४ वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देहूमध्ये आले. शरद पवार यांनी तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात पाऊल ठेवले आहे. देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत दर्शन घेतले. ‘मागच्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्या वर्षांत तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली. त्यामुळे मोरे घराणे मूळ घराणे आहे. त्यामुळे कुणाचं नाव घेण्याचे काही काम नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात संत तुकाराम महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहचवला जाणार आहे’, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिका अनावरण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. यावेळी तुकाराम पगडी घालून शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.

मी देव-दानव यापासून लांब असतो. पण काही देवस्थान अशी आहेत जी अंत:करणात आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेगाव, आळंदी, देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळतं, असं शरद पवार या कार्यक्रमात म्हणाले.

‘वारीला गेलो नाही, पण…’

आपण वारी केली नाही, पण त्याचा अनादरही केला नसल्याचं विधान काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी केलं होतं. कधी पंढरपूरला गेलो तर जास्त जणांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचं दर्शन घेतो. मुख्यमंत्री असताना कधीही शासकीय महापूजा चुकवली नाही, असं शरद पवार म्हणाले होते.

आमदार होताच अश्विनी जगताप ‘अॅक्शन मोड’वर; रुग्णालयात धडकल्या अन् डॉक्टरांना दिली तंबी
‘मी वारीपासून लांब असतो असं बोललं जातं. पण मला कोणत्याच गोष्टीचं अवडंबर केलेलं आवडत नाही. कधी पंढरपूरजवळ गेलो तर फार लोकांना बरोबर घेऊन न जाता गुपचूप पांडुरंगाचं दर्शन घेतो. याचे फोटो प्रसिद्ध व्हावेत, अशी माझी इच्छा नसते. राज्याची जबाबदारी माझ्यावर होती तेव्हा कधीही शासकीय पूजा चुकवली नाही,’ असं एका कार्यक्रमात शरद पवारांनी सांगितलं होतं.

नॉनव्हेज खाल्ल्यावर पवारसाहेब दगडूशेठला गेले नव्हते, सुप्रिया सुळेंनी तसंच वागायला हवं होतं: आनंद दवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here