नाशिक: जिल्हयातील देवळा तालुक्यात असणाऱ्या फुले माळवाडी गावाच्या गावकऱ्यांनी आपलं गावच विकायला काढले आहे. हे वाचून श्चर्य वाटलं असेल परंतू हे खरे आहे. गावच्या सभा मंडपात गावातील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत याबाबत ठराव केला आहे. शासनाकडे गाव विकण्याबाबतचा ठराव पाठविण्यात येणार आहे. गावकऱ्यांच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे जिल्ह्यात या गावाची जोरदार चर्चा सुरू आहे आहे.

शेतीप्रधान भारतातील शेतकरी हा हवालदिल झाला आहे. शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे, याची दखल घेतली जात नसल्याने देवळा तालुक्यातील माळवाडी या गावातील शेतकऱ्यांनी चक्क संपूर्ण गावच विक्रीला काढले आहे.गावातील शेतकरी व महिलांनी एकत्र येत संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे ‘ असा ठराव एकमताने केला आहे गावकऱ्यांच्या या निर्णयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

यासंदर्भात सोमवारी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. ५३४ हेक्टरवर माळवाडी गावात शेतकरी शेती व्यवसाय करत असून त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी म्हणून प्रमुख कांद्याचे पिक घेतले जात आहे. यामधील कोणत्याही शेती उत्पादित मालाला गेल्या ३ ते ४ वर्षापासून योग्य तो भाव मिळत नाही. विशेष म्हणजे गावातील ९५ टक्के शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहेत. तर माळवाडी आणि फुलेमाळवाडी गांवासह देवळा तालुक्यातील शेतकरी कांदा या प्रमुख पिकावर आपला उदरनिर्वाह करतात. गावात शेतीवर आधारित असलेली कुटुंब आहेत.आरोग्य, शिक्षण, लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही शेतकऱ्यांना शेती व्यवसायात उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे.

अवकाळीचा तडाख्याने शेतकरी हतबल! नाशिक जिल्ह्यात २,६८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

दैनंदिन गरजा व खासगी सरकारी बँकांची कर्ज चुकती करण्यासाठी या गावच्या शेतकऱ्यांकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी संपूर्ण माळवाडी गाव विकण्याचा ठराव गावात सभा घेऊन पास केला आहे. संपूर्ण गावकरीच गाव विकण्याच्या मनस्थितीत आले आहेत. शेतीवर आधारित असलेल्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्जफेड करण्याइतपत उत्पन्न मिळावे सरकारने दखल घ्यावी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे. ते सरकारनेच विकत घ्यावे अशी मागणी देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला प्रकरणी नवी अपडेट, हिंगोली पोलिसांनी सांगितलं वेगळं कारण, म्हणाले…

गाव विक्री करण्याच्या ठरावासाठी अमोल बागुल, प्रवीण बागुल, राकेश सोनवणे, अविनाश बागुल, अक्षय शेवाळे, यांच्यासह आदींनी सभा आयोजित करून सर्वानुमते ठराव पास करत सर्व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.

तुकाराम पगडी घालून सत्कार, २४ वर्षांनी शरद पवार देहूत संत तुकाराम महाराज मंदिरात

कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा संताप, थेट केंद्रीय मंत्र्यालाच घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here