नागपूर : घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आकाश सत्यनारायण शाहू (२७, नवीन कामठी) असे आरोपीचे नाव आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पीडित २३ वर्षीय तरुणी गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीला घराबाहेर झाडू मारत होती. यादरम्यान (एमएच 49 एव्ही 4509 क्रमांकाची) दुचाकी आली आणि दुचाकीस्वाराने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ते पळून नेले. त्यानंतर त्याने थोड्या दुर जाऊन आणखी एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली. त्यानंतर लगेचच हुडकेश्वर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये लाल हेल्मेट घातलेला एक तरुण दुचाकीवरून जाताना दिसला.

प्रेयसी दिवसा भिकारी बनून रेकी करायची आणि प्रियकर रात्री ते वाहन चोरायचा; का करायचे असं?
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गेल्या काही दिवसांपासून या फरार चोराचा शोध पोलीस घेत होते. अखेर हुडकेश्र्वर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात आरोपी हा कट्टर गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या चोरट्याचा ठावठिकाणा शोधून काढला. आता या चोराची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीच्या माहितीवरून त्याचा साथीदार प्रियांशू यशकुमार आहंदे (वय १७, बेझनबाग, जरीपटका) यालाही अटक केली. शहरातील विविध पोलिसठाण्या अंतर्गत चोरीच्या पाच घटना केल्याची कबुली दोघांनी दिली आहे.
व्यावसायिकांचे धाबे दणाणले; ED च्या धाडीत साडे ५ कोटींचे दागिने, सव्वा कोटींची रोकड जप्त, नागपुरात खळबळ
पोलिसांनी आरोपींकडून तीन दुचाकी, चार चेन आणि लाखोंचा माल जप्त केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here