पारनेर तालुक्यात खासदार विखे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांनी दूध आंदोलन केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात सरकार हे जनतेच्या मनाच्या विरोधात बनवले गेले आहे. फक्त आमदारांनी व मंत्र्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आघाडी केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनाच्या विरोधात हे करण्यात आले आहे . आजही खालच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नाही, असा आरोप करतानाच शिवसेनेचा कार्यकर्ता हा राममंदिराच्या मुद्द्यावर भाजप बरोबर असल्याचा दावा त्यांनी केला.
महाविकास आघाडीने करोना काळात ज्या पद्धतीने वातावरण हाताळले, ते पाहता हे सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. दूध दराबाबत राज्य सरकार उदासीन आहे. फक्त त्यांच्याकडून घोषणा केली जाते. पण दुसरीकडे शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळेच आम्हाला आंदोलन करावे लागत आहे, असेही ते म्हणाले.
वाचा:
दरम्यान, एखादा प्रश्न सुटायला लागल्यावर भाजप आंदोलन करते, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी नगरमध्ये बोलताना काल केला होता. त्यावर विखे म्हणाले, ‘आंदोलन करणे आमचे काम आहे. कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. तर निर्णय घेणे हे सरकारचे काम आहे व तो त्यांनी घ्यावा. आम्हाला त्याचे श्रेय नको.’
प्रशासन लोकप्रतिनिधींचा आवाज दाबतंय
नगर जिल्ह्यातील वाढत असलेल्या करोना परिस्थितीवरून पुन्हा एकदा खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रशासनावर तोफ डागली. खासदारांचे प्रशासन ऐकत नसेल तर आम्ही १८ लाख मते घेऊन निवडून कशाला आलो? असा सवाल करतानाच लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचे काम प्रशासन करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. ‘पालकमंत्र्यांच्या बैठकीत कुठलीही गोष्ट मांडली जात असताना, ती मांडणाऱ्या व्यक्तीचे शिक्षण काय आहे, हे तरी लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र येथे लोकप्रतिनिधींचे ऐकले जात नाही, हीच मोठी शोकांतिका आहे,’ असेही ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.