leopard found dead on railway engine in chandrapur, रेल्वे इंजिनवर बिबट्या मृत अवस्थेत आढळला, घटनेने एकच खळबळ; काय घडलं नेमकं? – leopard found dead on railway engine in chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये गेल्या दोन महिन्यात मृत झालेल्या वाघांची संख्या सात आहे. बिबट्या आणि तृणभक्षक प्राण्यांची संख्या बघितली तर अतिशय चिंताजनक आहे. रेल्वे मार्ग, शिकार, शेत पिकांसाठी वापरली जाणारी अघोरी सुरक्षा योजना वन्यजीवांसाठी मारक ठरत आहे. अशात जिल्ह्यातील घुग्घुस शहरातील कोळसा रेल्वे परिसरात रेल्वे इंजिनवर बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला? यावरू आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
जिल्ह्यातील घुग्घुस शहरातील कोळसा रेल्वे परिसरात रेल्वे इंजिनवर बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे. घुग्घुस येथील रेल्वे कोल सायडिंगवर उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनवर हा बिबट्य मृत अवस्थेत आढळला. विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने किंवा विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वे कोल सायडींगच्या बाजूला घनदाट वस्ती आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांसह पोलिसही घटनास्थळी पोहचले. यासोबतच बिबट्याला बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास वन विभाग करत आहे. बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वन विभागाकडून बिबट्याच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देण्यात येणार आहे. वाघांपेक्षा बिबट अधिक! ताडोब्यात संवर्धन व सुरक्षा ठरले महत्त्वाचे, प्रकल्पाला २८ वर्षे पूर्ण तो प्रसिद्ध मटकासूर वाघ तर नाही?
जिल्ह्यात दोन महिन्यांत सात वाघांचा मृत्यू झाला आहे. ताडोबा बफरअंतर्गत वन कर्मचारी गस्तीवर असताना दोन दिवसापूर्वी वाघाचा मृतदेह मिळाला होता. या घटनेची माहिती ताडोबा बफरचे उपवन संरक्षक पाठक यांना देण्यात आली. वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन केल्यानंतर नेमके कारण सांगता येईल, असे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले. काही दिवसांपूर्वी मामलाच्या जंगलात दोन वाघांची झुंज झाली होती. याच झुंजीत जखमी झालेल्या वाघाचा मृत्यू झाला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तर मृत्यू झालेला वाघ ताडोबातील प्रसिद्ध मटकासूर वाघ तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.