अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघ अद्याप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला नाही. जर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला असता तर WTCच्या फायनलमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला संघ झाला असता. पण ऑस्ट्रेलियाने ९ विकेटनी विजय मिळून अंतिम फेरीत स्थान पक्के केले. दुसऱ्या बाजूला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला अद्याप फायनलमध्ये पोहोचता आले नाही.

दोन्ही संघातील चौथी आणि अखेरची कसोटी अहमदाबाद येथे ९ मार्चपासून सुरू होत आहे. टीम इंडियासाठी निर्णायक ठरणाऱ्या या कसोटीच्या आधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला विश्वास वाटतो की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया WTCच्या अंतिम फेरीत पोहोचेल. यासाठी पॉन्टिंगने एक सल्ला देखील दिला आहे. टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमात एक छोटासा बदल केला तर मोठा फायदा होईल असे पॉन्टिंगचे म्हणणे आहे.

विजयापेक्षा किरण नवगिरेच्या बॅटची चर्चा; स्पॉन्सर मिळाला नाही, हाताने लिहले या व्यक्तीचे नाव
रिकी पॉन्टिंगच्या मते, WTCची फायनल इंग्लंडमध्ये होणार आहे आणि तेथील परिस्थीत भारतापेक्षा वेगळी असेल. यासाठी फायनल मॅचसाठी भारतीय संघाने फलंदाजीच्या क्रमात बदल करावा. सलामीवीर केएल राहुल गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे इंदूर कसोटीत शुभमन गिलला संधी मिळाली होती. यावर पॉन्टिंग म्हणाला, गिल आणि राहुल या दोघांना जून महिन्यात होणाऱ्या WTC फायनलमध्ये अंतिम ११ मध्ये स्थान द्यावे. राहुल संघातून बाहेर गेला आणि गिल संघात आला. पण मला वाटते या दोघांनी कसोटी क्रिकेट खेळले आहे आणि तुम्ही त्या दोघांना संघात ठेवू शकता.

WPL 2023: काल फक्त झलक पाहिली, अजून बेदम धुलाई होणार; नावावर आहे हा मोठा विक्रम
भारतीय संघात फायनलसाठी शुभमन गिलला सलामीवीर म्हणून ठेवता येईल तर राहुलला मधळ्याफळीत खेळवता येईल, कारण त्याला इंग्लंडमधील परिस्थिती खेळण्याचा अनुभव आहे, असे पॉन्टिंग म्हणाला. यावेळी पॉन्टिंगने ऋषभ पंतचा देखील उल्लेख केला. टीम इंडियात पंत सारख्या एका धडाकेबाज फलंदाजाची कमतरता आहे. ज्याने इंग्लंडमध्ये एक शतक देखील झळकावले आहे. राहुल हा कधीच विकेटकीपरचा पर्याय असू शकत नाही. श्रेयस अय्यरच्या जागी तो अंतिम ११ मध्ये असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here