लखनऊ: उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात एका दुकानदारानं होळीनिमित्त खास योजना जाहीर केली. एक मोबाईल घ्या अन् दोन बीयर मोफत न्या, अशी जाहिरात दुकानदाराकडून प्रसिद्ध करण्यात आली. मोबाईल आणि त्यासोबत बीयर असे फोटो दुकानदारानं व्हायरल केले. होळी बंपर धमाका असं नाव त्यानं ऑफरला दिलं. रेवडा पारसपूरजवळील एका मोबाईल दुकानदारानं ही ऑफर आणली.

एक अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि बीयरच्या दोन बाटल्या मोफत न्या, अशी जाहिरात दुकानदारानं केली. जाहिरात पाहून दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली. याबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. अशा प्रकारची जाहिरात प्रत्यक्षात करण्यात आल्याचं तपासातून निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी दुकानदार राजेश मौर्यला अटक केली. या जाहिरातीमुळे होळीच्या दिवशी शांततेचा भंग होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आई, प्लीज वाचव! ते मला संपवतील! फोनवर ओक्साबोक्शी रडला; बॉडी १३०० किमी दूर दोन भागात सापडली
दुसरीकडे हरदोई जिल्हा पोलिसांनी रविवारी २०२ जणांना अवैध दारु तयार करताना पकडलं. त्यांच्याकडून ३ हजार ७७८ लीटर अवैध दारु जप्त करण्यात आली. या अभियानाच्या अंतर्गत पोलिसांनी दारुच्या ५८ भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. ‘पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांनी अवैध दारुविरोधात मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत २०२ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ हजार ७७८ लीटर अवैध मद्य जप्त करण्यात आलं,’ अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here