कार्ल नावाच्या शास्त्रज्ञाची ही धक्कादायक कहानी विसाव्या शतकातील आहे. कार्ल हे जर्मनीमधील राहणारे होते. पण पहिल्या महायुद्धानंतर ते अमेरिकेला वास्तव्यास गेले. त्यावेळी ते फ्लोरिडाच्या वेस्ट हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन म्हणून काम करायचे आणि तिथे त्यांची ओळख झाली एलेनाशी. एलेना या रुग्णालयातली एक रुग्ण होती. ती २१ वर्षांची एक सुंदर तरुणी होती. हॉस्पिटलमध्ये टीबीचा उपचार करत होती.
तिच्या याच सौंदर्याला भाळले कार्ल….
जेव्हा उपचार सुरू होता त्यावेळी हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि तिथूनच सुरू झाली या भयंकर कहानीची सुरुवात. कार्ल यांना सतत वाटू लागलं की एलेना हीच त्यांची पत्नी आहे. तिचा जन्म त्यांची बायको म्हणूनच झाला आहे. कार्ल यांच्या मते जेव्हा ते १२ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या स्वप्नात एका आत्माने प्रवेश केला. या आत्माने तब्बल ४० वर्षांआधी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांच्या होणाऱ्या पत्नीविषयी त्यांना सांगितलं होतं आणि ती दुसरी-तिसरी कोणी नसून एलेनाचं असल्याचं कार्ल यांचं म्हणणं होतं. एलेनाने स्वप्नात येऊन याआधीही त्यांच्यासोबत अनेक क्षण घालवले आहेत आणि आता ती पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आली असंही कार्ल म्हणायचे.
खरंतर काल हे एक शास्त्रज्ञ होते, ते काही डॉक्टर नव्हते. पण तरीदेखील ते एलेनाच्या घरी जाऊन तिच्यावर उपचार करायचे. तिच्यावर उपचार सुरू असतानाच १९३१ मध्ये तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कार्ल पूर्णपणे हादरून गेले. त्यांनी तिच्यासाठी मकबराही तयार केला होता. पण नंतर त्यांनी तिच्या मृतदेहाला मृतदेहाला घरी आणलं आणि बेडरूममध्ये ठेवलं. बेडरूममध्ये कार्ल यांनी तिच्यासाठी विशेष सोयदेखील केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्ल यांनी मृतदेह तब्बल २ वर्षानंतर कब्रस्तानमधून बाहेर काढला आणि तो घरी आणला. मृतदेह पूर्णपणे सडू लागला होता. त्यामुळे त्यांनी तिच्या मृतदेहाला अल्कोहोलने धुतलं. तिला नव्या नवरीसारखे कपडे घातले. तिच्या डोळ्यांच्या जागी काचेचे गोळे चिटकवले. तिच्या चेहऱ्यावरती मास्क घातलं आणि तिला अगदी नव्या नवरीसारखं बेडरूममध्ये सजवून ठेवलं. तिच्या सोबतच आपलं आयुष्य घालवण्यास त्यांनी सुरुवात केली.
सात वर्षांपर्यंत मृतदेहालाच समजत होता पत्नी…
पत्नीच्या मृतदेहाला कार्ल यांनी एका जुन्या विमानामध्ये ठेवलं होतं जे त्यांनी आधीच खरेदी केलं होतं. या विमानामध्ये मृतदेह सडू नये यासाठी पूर्णपणे व्यवस्था केली होती. ते विमान आतमधून इतकं थंड होतं की एलेनाचा मृतदेह तिथे सुरक्षित होता. त्यामुळे ७ वर्षांपर्यंत हा मृतदेह त्या विमानातच होता. कार्ल हे रोज तिच्याकडे जायचे, तिला किस करायचे, तिच्यासोबत वेळ घालवायचे आणि पुन्हा रूमवर यायचे. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल आणि तुमचा विश्वास बसणार नाही पण या सनकी शास्त्रज्ञाचं एक कुटुंबही होतं. त्यांची पत्नी, मुलं होती. पण हे सगळं सोडून काल यांना वेड लागलं होतं फक्त एलेनाचं. यामुळे त्यांची नोकरीही गेली. त्यांचे पैसेही संपू लागले. परंतु, त्यांनी त्यांचा सगळा पैसा हा एलेनाच्या मृतदेहाला सुरक्षित ठेवण्यामध्ये लावला. ते रोज तिच्यासोबत वेळ घालवायचे ते तिच्यासोबत झोपायचे. त्या मृतदेहालाच पकडून राहायचे. अनेक वर्षांनी मृतदेहातून दुर्गंधी पसरू लागली होती. किडे बाहेर येत होते परंतु तरीदेखील कार्ल हे तिथेच राहायचे.