पुणे : मनसेचे पुणे शहरातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांच्या मुलाला खंडणीसाठी धमकावण्याचे विविध मेसेजेस आले आहेत. ज्यामध्ये ८० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सअ्ॅपवर मेसेज करून लग्न झाल्याचं बनावट सर्टिफिकेट व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली. तसंच पैसे नाही दिले तर गोळी घालून ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याबाबत रुपेश मोरे याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी अज्ञात मोबाईल नंबरवरून रुपेशला मेसेज आला होता. ज्यात म्हटलं होतं की, ‘छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीतील विवाह नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे अन्फिया शेख या मुलीसोबत तुझा विवाह झाला आहे. आम्ही तुझ्या नावाचं विवाह प्रमाणपत्रही बनवलेलं आहे. खराडी आयटी पार्क येथे लावलेल्या इनोव्हा गाडीत २० लाख रुपये आणून ठेव नाहीतर तुझ्याविरोधात बलात्काराची तक्रार देऊ.’

भाजी विक्रेत्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले तब्बल १७२ कोटी, पण झाला भलताच घोळ

७ फेब्रुवारीच्या मेसेजनंतर २७ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी पुन्हा रुपेश मोरे याच्या मोबाईलवर अशाच प्रकारची धमकी देत पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. तसंच तुला मारण्याचा संपूर्ण प्लॅन तयार असून गोळी झाडून तुला संपवून टाकू, अशी धमकी मेसेजमधून देण्यात आली होती.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर आता अखेर वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याच्या जबाबानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून धमकीचा मेसेज आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here