bullet fired in holika dahan, होळीच्या सणाला गालबोट, होलिका दहनाला शेण फेकण्यावरुन वाद, तिघांवर गोळीबार… – man lost life and three injured in firing during holika dahan bhojpur bihar
पाटणा: बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील चंडी पोलीस स्टेशन हद्दीतील सलेमपूर गावात मंगळवारी सकाळी होलिका दहनावेळी झालेल्या वादात गोळीबार करण्यात आला. सशस्त्र हल्लेखोरांनी चुलत भावांवर गोळ्या झाडल्या. उपचारासाठी त्यांना आरा रुग्णालयात आणले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात मृताच्या पुतण्यासह गावातील एक महिलाही गोळीबारात जखमी झाली आहे. त्यानंतर नातेवाईकांनी या तिघांनाही उपचारासाठी आरा सदर रुग्णालयात आणले. तेथून प्रथमोपचार दिल्यानंतर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पाटणा येथे रेफर करण्यात आले.
गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला पाटण्याला नेण्याऐवजी घरच्यांनी त्याला आरा शहरातील बाबू बाजार येथील खाजगी रुग्णालयात नेले. जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर, दोन जखमींवर आरा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचं नाव धनी यादव आहे. तर या घटनेत एक १६ वर्षीय मुलगा आणि मृताचा चुलत भाऊ गोळीबारात जखमी झाले आहेत.
मृताच्या चुलत भावाने सांगितले की, सोमवारी रात्री सर्वजण होलिका दहनासाठी जात होते. तेव्हा आरोपी पक्षातील काही मुलं सर्व लोकांवर शेण फेकत होती. काही लोकांनी त्यांना यासाठी रागावलं. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ आणि गोळीबार सुरू केला. त्यामुळे गावकरी जमा झाले. सोमवारी रात्री हा वाद निवळला असं सर्वांना वाटलं.
मृतकाचा चुलत भाऊ रणजीत यादव याने गावातील अमरुधी आणि बाबुआ यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याने आरा सदर रुग्णालय गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.