आयआयएफएल सिक्युरिटीचे रिसर्चर अनुज गुप्ता यांनी सांगितलं, की सोनं आणि चांदीचा भाव यावेळी रेंज बाउंड आहे. सोन्या-चांदीच्या किमतीतील प्रमुख ट्रिगर यूएस डॉलरच्या दरामुळे येत आहे. रेंज बाउंड ट्रेडमध्ये डॉलर इंडेक्स १०४ च्या वर आहे. त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत असून सध्या दर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून सोने दरात सतत वाढ होती होती. आता दर काहीसा कमी झाला आहे.
सराफा बाजारातील तज्ञ सुगंधा सचदेवा यांनी सांगितलं की, सोन्याच्या दरातील ही घसरण या आठवड्यातही कायम राहू शकते. या आठवड्यातील फेब्रुवारीचा यूएस जॉब रिपोर्ट आणि यूएस फेडकडून मिळणारे संकेत या आठवड्यात महत्त्वाचे ठरतील.
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन विश्लेषक निरपेंद्र यादव यांनी सांगितलं, की या आठवड्यात सोन्याच्या विक्रीवर दबाव दिसू शकतो. सोन्याचा दर ५५,००० च्या जवळपास असू शकतो. तर चांदीचा दर ६१,५०० रुपयांपर्यंत असू शकतो. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
मिस्ड कॉलद्वारे असा तपासा आजचा सोन्याचा भाव
सोने – चांदीचा आजचा भाव मिस्ड कॉल देऊनही जाणून घेता येईल. आजचा सोन्याचा भाव तपासण्यासाठी ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता.