: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम इथल्या ” परिसरात अचानक क्रेन कोसळल्यानं मोठा अपघात घडलाय. हजारो किलो वजनाची ही क्रेन अंगावर कोसळल्यानं या भागात काम करणाऱ्या ११ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही या क्रेनखाली काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओही समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहतो.
वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, डीसीपी सुरेश बाबू यांनी घटनेबद्दल माहिती देताना क्रेन अपघातात १० जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच मृत्यूचा आकडा ११ वर पोहचला. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I like the valuable information you provide in your articles.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.