जयदीप हा तळेगाव जवळील आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७ ते ८ विद्यार्थी धुलिवंदनाचा आनंद लुटत होते. खेळून झाल्यानंतर ते सर्व जण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात हातपाय धुण्यासाठी गेले होते. यावेळी हातपाय धुताना जयदीप पाटील याचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात बुडाला.
यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्याला वाचविण्यात अपयश आल्याने अखेर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी जयदीपचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना जयदीपचा मृतदेह शोधण्यास यश आले व मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
भर मंचावर शरद पवारांच्या डोळ्यात पाणी, रयत शिक्षण संस्थेची वाटचाल ऐकताना पवार गहिवरले