अहमदनगर: ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार यांनी माजी मंत्री यांना दिलं आहे.

दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. ‘करोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना दिलासा देण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. शेतकरी, दूध उत्पादक रस्त्यावर आले आहेत. विजेची बिलं अव्वाच्या सव्वा येताहेत. खतं मिळेनासी झाली आहेत. कांद्याचा भाव कमी झालाय. या सरकारला जनतेशी आणि शेतकऱ्यांशी काहीही घेणंदेणं नाही. ‘एका नवरा आणि दोन बायका’ अशी या सरकारची अवस्था आहे. या तिघाडीचा खेळ आता आवरत आला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही,’ असं राम शिंदे म्हणाले होते.

वाचा:

वाचा:

खासदार लोखंडे हे एका कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असं लोखंडे म्हणाले.

दूध दराच्या प्रश्नावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘दूध उत्पादक व्याकूळ झाले आहेत ही खरी गोष्ट आहे. दुग्धजन्य पदार्थांना मार्केट मिळत नाही. त्यामुळं केंद्र सरकारनं व राज्य सरकारनंही निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिलं पाहिजे, अशी खासदार म्हणून माझीही भूमिका असल्याचं लोखंडे यांनी सांगितलं.

हेही वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here