महिला सन्मान

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित असतील. विविध क्षेत्रांमध्ये कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात येईल.

महिला लोककलाकारांचे संमेलन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी आणि राज्य सरकारच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांच्या संकल्पनेतून भारतातील काही राज्यांमधील महिला यावेळी लोककला सादर करतील. सकाळी १० वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

महिला धोरणेचा मुहूर्त पुन्हा हुकणार, आज विधिमंडळात स्थान नाहीच; पण…

नारी चेतना

साहित्य अकादमीच्या माध्यमातून साहित्य अकादमी सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर पूर्व येथे नारी चेतना हा कार्यक्रम ८ मार्च रोजी सायं. ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यात सरोज पाटणकर, पद्मजा कुंडाजी, संस्कृतिराणी देसाई आणि गीता बिंद्राणी या कवयित्री बहुभाषक कविता सादर करतील.

पुस्तक प्रकाशन

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारितेतील तीन दशकांच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राही भिडे यांचे आत्मकथन बुधवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे, कपिल पाटील, अर्जुन डांगळे उपस्थित राहणार आहेत. हे पुस्तक शब्द प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र हादरला! शाळेतून घरी आली की गप्प-गप्प होती चिमुरडी, वडीलांनी प्रेमाने विचारताच थरकाप उडाला
अभिवाचन कार्यक्रम

मराठी विज्ञान परिषदेने बुधवारी दुपारी ३.३० वाजता ‘कहाणी अमर्त्य पेशींची’ हे अभिवाचन आयोजित केले असून वंदना अत्रे आणि शोभना भिडे हे अभिवाचन सादर करणार आहेत. हा कार्यक्रम मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी येथे होईल.

पोस्टविमेनचा सत्कार

भारतीय पोस्ट, मुंबई विभाग आणि अंकीबाई गोवानी ट्रस्टच्या माध्यमातून ८ मार्च रोजी २४० पोस्टविमेनचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुंबईच्या जीपीओ परिसरातील मेघदूत टेरेस येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशा प्रकारे भारतीय टपाल खात्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पोस्ट विमेनचा सत्कार करण्यात येत आहे.

कोणी फोडला १२ वीच्या गणिताचा पेपर, आरोपीला शोधण्यात पोलिसांना मोठं यश; नाव वाचून हादराल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here