टर्न की/ ईपीसी तत्त्वावर वांद्रे पश्चिम परिसरातील पटवर्धन पार्क उद्यान, बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तर बाजूकडे बहुमजली इलेक्ट्रिकल कार पार्किंग (शटल आणि रोबो पार्किंग) नियोजन, आरेखन, बांधकामासाठी ई-निविदा निमंत्रण मागवण्यात आले आहेत. या वाहनतळाची देखभाल आणि सर्व्हिसिंग, तसेच मनुष्यबळ २० वर्षांसाठी कंत्राटदाराला पुरवावे लागणार आहे. वाहनतळ उभारणीनंतर पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रचालन, देखभाल आणि साफसफाई ठेवणे बंधनकारक आहे.
कुलाबा ए विभागात फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) येथील अप्सरा पेन शॉपसमोरील वाहतूक बेटात तसेच वरळी जी दक्षिण प्रभागामधील डॉ. ई. मोझेस रोड येथील महापालिका इंजिनीअरिंग हब इमारतीला लागून असलेल्या प्लॉटवर भूमिगत वाहनतळ उभारले जाणार आहे. या वाहनतळाची देखभाल आणि सर्व्हिसिंग तसेच मनुष्यबळ २० वर्षांसाठी कंत्राटदाराला पुरवावे लागणार आहे. वाहनतळ उभारणीनंतर पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रचालन, देखभाल आणि साफसफाई ठेवणे बंधनकारक आहे.
हुतात्म्यांच्या वारसांना पार्किंग कंत्राट
कुलाबा ए विभागात मुंबई समाचार मार्ग, फोर्ट येथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना, तसेच वारसांच्या संस्थेला पे अँड पार्कचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पार्किंग व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी निविदा मागवल्या आहेत. या वाहनतळातून पालिकेला एक कोटी २४ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.